भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आगामी आशिया चषकासाठी पूर्णपणे तयार आहे. भारताला आशिया चषकातील अभियानाची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करायची आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी विराटने सरावाला सुरूवात केली आहे. सराव सत्रातील त्याचे प्रदर्शन पाहून चाहते अंदाज बांधत आहेत की, तो पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक असला, तरी सध्या कारकिर्दीतील सर्वात खराब काळातून जात आहे. त्याने मागच्या १००० दिवसांपेक्षा जास्त काळापासून एकही शतक केले नाहीये. नोव्हेंबर २०१९ मध्ये मायदेशात बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात त्याने शेवटचे शतक केले होते. तेव्हापासून चाहते त्याच्या शतकाची वाट पाहत आहेत, परंतु त्यांना वारंवार निराशा मिळत आहे. असे असले तरी, मोठ्या विश्रांतीनंतर मैदानात पुनरागमन करताना तो चांगले प्रदर्शन करेल, असा अंदाज बांधला जात आहे.
मागच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यात विराट संघासोबत होता, परंतु अपेक्षित खेळी करू शकला नाही. त्यानंतरच्या वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याने माघात घेतली. दरम्यानच्या काळात विश्रांती घेतल्यानंतर विराट नव्या जोमाने मैदानात उतरला आहे. आशिया चषकाची सुरूवात होण्यापूर्वी संघाच्या सराव सत्रात त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओत तो रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या चेंडूवर एक मोठा शॉट मारताना दिसतो.
This Shot after ages 🥶🚀@imVkohli
.
.
.
.#AsiaCup2022#ViratKohli𓃵 #ViratKohli pic.twitter.com/IDjxP1ZiCZ— Gaurav Agarwal (@GauravA1802) August 25, 2022
दरम्यान, आशिया चषकात भारतीय संघ पाकिस्तान आणि हॉन्ग कॉन्ग यांच्यासोबत ग्रुप ए मध्ये आहे. दुसरीकडे बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघ ग्रुप बी मध्ये आहेत. ग्रुप स्टेजमध्ये जे संघ सुरुवातीच्या दोन क्रमांकांवर असतील, त्यांना सामना सुपर चार फेरतील दुसऱ्या ग्रुपमधील दोन्ही संघांसोबत होईल. त्यांतर अंतिम सामन्यासाठी संघ निश्चित केले जातील.
https://twitter.com/Cricket_Is_Here/status/1562658104537333761?s=20&t=fAt18Hqs6NCS2zE7-dQnMw
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान संघ मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात आमने सामने आले होते. यावेळी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. विराट कोहलीच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारताने १५० धावा केल्या होत्या. परंतु, गोलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाही आणि पाकिस्तानने हा सामना १० विकेट्स राखून जिंकला होता. या लाजिरवाण्या पराभवाचा बदला भारतीय संघ आशिया चषकात घेण्याचा प्रयत्न नक्की करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्ध खेळायला उतरताच कोहली रचणार विश्वविक्रम! ठरणार ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय
शुबमन गिलने स्वत: नाकारली टीम इंडियाची कॅप्टन्सी! मोठं कारण आलं समोर
भारत-पाकिस्तान महामुकाबल्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात! जाणून घ्या काय आहे किंमत