आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला 164 धावांचे लक्ष्य दिले आहे. परंतु, बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान एक मजेदार दृश्यही पाहायला मिळाले. जेव्हा दोन्ही फलंदाज धावा घेण्याच्या प्रक्रियेत समान टोकाला पोहोचले. त्यानंतर एका फलंदाजाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागला.
बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज आणि नजमुल शांतो 37 व्या षटकात फलंदाजी करत होते. दरम्यान धाव घेण्याच्या बाबतीत दोघांमध्ये चूक झाली. धावा काढण्याच्या प्रक्रियेत दोघेही एकाच बाजूने पोहोचले. मेहंदी हसन मिराज आधीच निघून गेला होता त्यामुळे त्याला त्याची विकेट गमवावी लागली. मेहंदी 11 चेंडूत पाच धावा करून तंबूत परतला. मात्र दोघांच्या या चुकीमुळे बांगलादेशचे निश्चितच नुकसान झाले आणि संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही.
विशेष म्हणजे अशाप्रकारे धावा काढण्याच्या प्रक्रियेत दोन्ही फलंदाज एकाच टोकाला पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही क्रिकेटमध्ये असे दृश्य अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यामुळे फलंदाजांनी विकेट गमावल्या आहेत.
A big mix-up between Najmul Hossain Shanto and Mehidy Hasan Miraz.
Mehidy Hasan Miraz pays the price.#AsiaCup2023#SLvBAN
📸: Disney + Hotstar pic.twitter.com/laE87juI60— Shubham Tiwari 🇮🇳 (@shubham84777556) August 31, 2023
बांगलादेशला पहिल्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. बांगलादेशला पूर्ण पन्नास षटकेही खेळता आली नाहीत. बांगलादेशचा संघ 42.4 षटकात 164 धावा करत सर्वबाद झाला. शंत्तो सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, याशिवाय दुसरा कोणताही फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर जास्त काळ टिकू शकला नाही.
भारत विरुद्ध पाकिस्तान रंगणार महासामना
दरम्यान भारत आणि पाकिस्तान संघ 2 सप्टेंबरला आमने-सामने असणार आहेत. भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. तर आता पाकिस्तान संघही श्रीलंकेला पोहचला आहे. या दोन संघातील महासामना पाहण्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. या सामन्यात कोण जिंकणार आहे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (asia cup 2023 bangladesh vs sri lanka match run out)
महत्वाच्या बातम्या-
IND vs PAK महामुकाबल्यापूर्वी माजी खेळाडूचा बाबरला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘भारताविरुद्ध हारलो तरीही…’
गंभीरचे शार्दुलबद्दल वादग्रस्त विधान! म्हणाला, “तो बिट्स अँड पीस खेळाडू”