आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील महामुकाबला 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्यावर लागले आहे. हा सामना सहयजमान श्रीलंकेच्या कँडी येथील पल्लेकेले स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. तसं पाहिलं, तर भारताचे श्रीलंकेसोबत क्रिकेटचे नाते फार जुने आहेत. दोन्ही संघांमध्ये भरपूर सामने खेळले गेले आहेत. मात्र, ज्या मैदानावर शनिवारी सामना खेळला जाणार आहे, तिथे भारतीय संघाने खूपच कमी सामने खेळले आहेत.
परंतु येथील आकडे पाहून भारतीय क्रिकेटप्रेमी नक्कीच खुश होईल. विशेष म्हणजे, पाकिस्तान संघाला यादरम्यान भारताच्या दोन खेळाडूंपासून सावध राहण्याची गरज आहे. ते दोन खेळाडू म्हणजेच कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) होय.
भारतीय संघाची श्रीलंकेतील आकडेवारी
यावेळी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेचे आयोजन श्रीलंका (Sri Lanka) आणि पाकिस्तान (Pakistan) या देशामध्ये होत आहे. मात्र, भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. सुपर 4मधील सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचे दोन सामने पल्लेकेले येथे होणार आहेत. भारताने जर सुपर 4मध्ये एन्ट्री केली, तर त्यानंतरचे सामने कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडिअमवर खेळले जातील.
भारतीय संघ श्रीलंकेत 1985पासून आतापर्यंत 89 सामने खेळला आहे. यापैकी 45 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच, 35 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्ध येथे खेळलेल्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर ही संख्या 64 इतकी आहे. यामध्ये भारताने 30 सामने जिंकले आहेत, तर 28 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
रोहित आणि बुमराहची पल्लेकेलेमध्ये शानदार आकडेवारी
भारत-पाकिस्तान सामना पल्लेकेले येथे आहे. त्यामुळे याविषयी बोलायचं झालं, तर भारताने आतापर्यंत या मैदानावर 3 सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. म्हणजेच, भारताची विजयी टक्केवारी 100 टक्के आहे. भारत एकदा फलंदाजी करताना, तर दोन वेळा आव्हानाचा पाठलाग करताना जिंकला आहे. पल्लेकेले या स्टेडिअममधील रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांची आकडेवारी चांगली राहिली आहे. रोहितने या मैदानावर खेळलेल्या दोन वनडे डावात एक अर्धशतक आणि एक शतक केले आहे. त्याने पहिल्यांदा 54 धावांची खेळी साकारली होती. तसेच, दुसऱ्या वेळी त्याने नाबाद 124 धावांची वादळी खेळी साकारली होती.
दुसरीकडे, जसप्रीत बुमराह याने आतापर्यंत 2 वेळा या स्टेडिअमवर गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 9 विकेट्स घेतल्या आहे. पहिल्यांदा खेळताना त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, दुसऱ्यांदा त्याने 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. अशात पाकिस्तानला भारताच्या या दोन धुरंधरांपासून सावध राहावे लागेल. (asia cup 2023 indian cricket team record at pallekele know here)
हेही वाचाच-
लंकन सिहांनी शांत केले बांगला टायगर्स! श्रीलंकेची शानदार विजयाने सुरुवात
IPL फायनलमध्ये CSKचा घाम काढणाऱ्या खेळाडूचा मोठा निर्णय, विदेशी संघासोबत केला ‘एवढ्या’ सामन्यांचा करार