भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे. बुमराहने नुकतेच आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून मैदानात पुनरागमन केले. पुनरागमनानंतर दोन सामने खेळण्यानंतर त्यायला लगेच आशिया चषक खेळायचा आहे. वेगवान गोलंदाज यासाठी सराव सत्रात घाम गाळत आहेच. पण त्याने आशिया चषकासाठी नवा लूक देखील केला आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून जवळपास 11 महिन्यांनी मैदानात पुनरागमन केले. मागच्या दोन वर्षांमध्ये वेगवान गोलंदाज सतत दुखापतग्रस्त राहिला आहे. त्याने काही सामन्यांसाठी संघात पुनरागमन देखील केले होते. पण पुन्हा दुखापत जाल्यामुळे त्याला संघातील स्तान गमवावे गालले होते. दुखापतीच्या कारणास्तव बुमराह मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात आणि यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळू शकला नव्हता. भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्स फ्रँचायझीला त्याची कमी जाणवली. पण आशिया चषक 2023मध्ये बुमराह जोरदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
नेट्समध्ये त्याने आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर जोरदार सराव केलाच आहे. पण सेलिब्रिटी आलिस हकीम याने आपल्या अधिकृत सोशलम मीडिया खात्यावरून बुमराहच्या नव्या हेअर कटची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे. अलिक हकीम याने शेअर केलेल्या व्हिडिओत बुमराह हेअर कट करताना दिसत आहे. हेअर कट पूर्ण झाल्यानंतर बुमराहचा एक नवा अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे. चाहते यावर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. आशिया चषकात बुमराह कसे प्रदर्शन करतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, दुखापतीमुळे दीर्घ काळ संघातून बाहेर असलेल्या बुमराहने बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कसून सराव केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याला संघातून बाहेर असल्यासारखे जाणवले नाही, कारण एनसीएमध्ये त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गोलंदाजी करवून घेतली जात होता. दरम्यानच्या काळात त्याने पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंड दौरा देखील केला होता. असे असले तरी, सध्या तो संघात परतला आहे आणि आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 लामन्यात आपली फिटनेस देखील सिद्ध केली आहे. (Jasprit Bumrah has got a new haircut for the Asia Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
Virat Kohli । आशिया चषकात न्यू लूकमध्ये दिसणार किंग कोहली, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची विलियम्सनला डेडलाईन! ‘या’ तारखेपर्यंत व्हावे लागणार फिट