भारत विरुद्ध बांगलादेश संघ आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीच्या अखेरच्या सामन्यात आमने-सामने आहेत. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्याद्वारे दोन्ही संघ वनडे विश्वचषक 2023 पूर्वी अखेरचे भिडत आहेत. या सामन्यात अनेक खेळाडू विक्रम करण्याच्या प्रयत्नात असतील. अशातच भारतीय संघाचा कर्णदार रोहित शर्मा याच्याकडे महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मोठा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.
सचिनचा विक्रम मोडण्याची संधी
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या 4 डावात 64.67च्या सरासरीने 194 धावा केल्या आहेत. रोहितने यादरम्यान 3 अर्धशतक, 24 चौकार आणि सर्वाधिक 11 षटकार मारले आहेत.
वनडे आशिया चषक स्पर्धेत भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 1990 ते 2012 यादरम्यान वनडे आशिया चषकातील 23 सामन्यात खेळताना 51.10च्या सरासरीने आणि 85.47च्या स्ट्राईक रेटने 971 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे.
सचिनपाठोपाठ या यादीत भारताचा दुसरा फलंदाज रोहित शर्मा आहे. रोहितला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 33 धावांची गरज आहे. रोहितने 2008 ते 2023 यादरम्यान वनडे आशिया चषकातील 27 सामन्यात आतापर्यंत 49.42च्या सरासरीने आणि 89च्या स्ट्राईक रेटने एकूण 939 धावा केल्या आहेत. रोहितने एक शतकही केले आहे. हा रोहितचा 27वा सामना आहे. तसेच, रोहित आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
शाकिबकडे खास विक्रम करण्याची संधी
बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन हा अलीकडेच न्यूझीलंडच्या डॅनियल विटोरी याचा विक्रम मोडत जगातील दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे. याव्यतिरिक्त आशिया चषकातील विक्रमाविषयी बोलायचं झालं, तर त्याच्या नावावर सध्या 21 विकेट्स आहेत. जर त्याने 18व्या सामन्यात भारताविरुद्ध 2 विकेट्स घेतल्या, तर तो या क्रिकेट प्रकारात बांगलादेशचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल. तसेच, तो डावखुरा फिरकीपटू अब्दुर रज्जाक याचा 22 विकेट्सचा (18 सामन्यात) विक्रम मोडीत काढेल. शाकिब 23 विकेट्ससह यादीत चमिंडा वास (23) याच्यासह संयुक्तरीत्या सहाव्या स्थानी असेल. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 30 विकेट्ससह या यादीत अव्वलस्थानी आहे. (asia cup 2023 india vs bangladesh captain rohit sharma to break sachin tendulkar massive record know here)
हेही वाचा-
लकी फॅन! धोनीच्या बाईकवर बसून धन्य झाला चाहता, सतत पाहिला जातोय व्हिडिओ
संघ व्यवस्थापनाकडून विराटकडे वॉटरबॉयची जबाबदारी, माजी कर्णधाराची अवस्था पाहून चाहते नाराज






