आशिया चषक 2023च्या सुपर फोर फेरीतील शेवटचा सामना शुक्रवारी (15 सप्टेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघाने आधीच अंतिम सामन्यात स्थान पक्के केले असल्यामुळे संघातील काही वरिष्ठ खेळाडू बांगलादेशविरुद्ध खेळताना दिसले नाहीत. विराट कोहली देखील या सामन्यात विश्रांतीवर आहे. यादरम्यान संघ व्यवस्थापनाने विराटकडे वॉटर बॉयची जबाबदारी सोपवल्याचे पाहायला मिळाले.
भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील हा सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2023चा अंतिम सामना देखील कोलंबोमध्येच 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यातील दोन्ही संघ निश्चित झाले असल्यामुळे शुक्रवारी (15 सप्टेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला जास्त काही महत्व नव्हते. अशात भारतीय संघ व्यवस्थापनाने विराट कोहली (Virat Kohli), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या यांना विश्रांती दिली. दुसरीकडे तिलक वर्मा याने वनडे पदार्पण केले असून शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले.
Virat Kohli is carrying drinks for India today. (Rohit Juglan).
He’s rested from today’s match, but he’s still giving his best for the team! pic.twitter.com/uz5dtqKAeR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 15, 2023
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी आल्यानंतर रोहित खेळपट्टीवर बॅट घेऊन दिसला नाही. फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन विराटच आला. वॉटरबॉयच्या भूमिकेतील विराट कोहलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (Virat Kohli performed the role of waterboy in the match against Bangladesh)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश – लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, अनमूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! ग्लेन मॅक्सवेल बनला बापमाणूस, पत्नी विनीने दिला मुलाला जन्म, नाव काय ठेवलंय माहितीये?
भारताची विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘यंदा World Cup Trophy आपलीच’






