भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेत सोमवारी (दि. 04 सप्टेंबर) नेपाळ संघाविरुद्ध 10 विकेट्स विजय मिळवला. हा सामना भारताने जिंकला असला, तरीही सामन्यातील भारतीय खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय ठरत आहे. श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि ईशान किशन यांनी सुरुवातीचे काही महत्त्वाचे झेल सोडले होते. मात्र, नंतर विराट आणि किशनने शानदार झेल पकडले. आता ईशानच्या शानदार झेलाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
किशनचा ‘ई’शानदार झेल
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या नेपाळच्या डावातील 48व्या षटकादरम्यान ईशान किशन (Ishan Kishan) याने शानदार झेल पकडला. 56 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावांवर खेळत असलेल्या सोमपाल कामी याने मोहम्मद शमी याच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात चेंडू हवेत उंच गेला. यानंतर किशनने आपल्या उजव्या बाजूला झेप घेतली आणि हवेत शानदार झेल पकडला.
अवघ्या 230 धावांवर ढेपाळला नेपाळ संघ
ही विकेट पडताच नेपाळने सर्व विकेट्स गमावत 47.2 षटकात फक्त 230 धावाच केल्या. नेपाळकडून फलंदाज आसिफ शेख याने 58, कुशल भुर्तेलने 38 आणि सोमपाल कामीने 48 धावांचे योगदान दिले. तसेच, भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा चमकले. सिराजने 9.2 षटकात 61 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. तसेच, जडेजाने 10 षटके गोलंदाजी करताना 40 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या.
What a take by Ishan Kishan – flying….!! pic.twitter.com/jBBG2XiCol
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2023
या दोघांव्यतिरिक्त मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनाही विकेट घेण्यात यश आले, तर कुलदीप यादवला एकही विकेट मिळाली नाही. शमी, पंड्या आणि शार्दुलने प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली होती.
Good catch by ishan kishan [star sports] #IndvsNep pic.twitter.com/OqrINutygx
— Jahid hasan (@Jahidhasan6686) September 4, 2023
भारताचा शानदार विजय
नेपाळने 230 धावा केल्या असल्या, तरीही पावसामुळे हे आव्हान डकवर्थ लुईस नियमानुसार 23 षटकात 145 इतके झाले. हे आव्हान भारताने 20.1 षटकात 147 धावा करून पार केले आणि 10 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने नाबाद 74, तर शुबमन गिलने नाबाद 67 धावा केल्या. (asia cup 2023 india vs nepal ishan kishan flying in the air and takes stunning catch see here)
महत्त्वाच्या बातम्या-
इतिहास घडला! भारताने 10 विकेट्सने विजय मिळवताच रोहित-शुबमन जोडीच्या नावावर खास विक्रमाची नोंद, वाचा
‘हिटमॅन’सारखा कुणीच नाही! Asia Cupमध्ये रोहितने घडवला इतिहास, बनला सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल भारतीय