आशिया चषक 2023 मधील पाचवा सामना भारत आणि नेपाळ या संघात सोमवारी (4 सप्टेंबर) होणार आहे. भारतीय संघाने आशिया चषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. यामुळे भारतीय संघाला एक आणि पाकिस्तान संघाला एक गुण मिळाले. यामुळे भारताला सुपर 4 टप्प्यात पोहचायचे असेल तर नेपाळला पराभूत करून 2 गुण मिळवावे लागेल.
पाकिस्तान संघाने स्पर्धेतचा पहिला सामना नेपाळविरुद्ध 238 धावांनी जिंकून 2 गुण मिळले होते. पाकिस्तान संघाने 3 गुणांसह सुपर 4 टप्प्यात पदार्पण केले आहे. भरतीय संघचा वेगवान दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे मुंबईत परतला आहे. आता बुमराहच्या जागी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
भारत आणि नेपाळ हा सामना या ठिकाणी खेळवला जाईल
भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना 4 सप्टेंबर, शनिवारी पल्लेकल येथील पल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी अडीच वाजता होईल.
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. तसेच भारत आणि नेपाळ सामना डिज्नी प्लस हॉटस्टारद्वारे विनामूल्य थेट मोबाईलवर प्रक्षेपित केला जाईल.
भारतीय संघाची नेपाळविरुद्ध संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, ईशान किशन (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, मोहम्मद शमी मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
नेपाळ संघाची संभाव्य प्लेइंग 11
रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल बारटेल, दीपेंद्र सिंग ऐरे, करण केसी, कुशल मल्ला, आसिफ शेख (यष्टीरक्षक), गुलशन झा, ललित राजबंशी, संदीप लामिछाने, सोमपाल कामी. (asia cup 2023 india vs nepal match live streaming )
महत्वाच्या बातम्या-
हेडच्या झंझावाताने ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश! मार्शच्या नेतृत्व कारकिर्दीची शानदार सुरुवात
बांगलादेशपुढे अफगाणिस्तानने टाकल्या नांग्या, शाकिब सेनेचा निर्णायक विजय