आशिया चषक 2023 मधील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचे पहिले चार फलंदाज केवळ 66 धावांवर तंबूत परतले. मात्र, त्यानंतर ईशान किशन व उपकर्णधार हार्दिक पंड्या यांनी शानदार शतकी भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुढे केले. दोघांनी दमदार अर्धशतके ठोकत भारतीय संघाला 266 अशी संघर्षात्मक धावसंख्या उभारून दिली. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी याने सर्वाधिक चार बळी मिळवले.
या बहुचर्चित सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम घेतलेला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने रोहितला 11 तर विराटला केवळ चार धावांवर त्रिफळाचित भारतीय संघाला अडचणीत टाकले. पु़नरागमन करत असलेला श्रेयस अय्यर 14 तर सलामीवीर शुबमन गिल 10 धावा करून बाद झाले. भारतीय संघ 66 धावांवर चार गडी गमावले असताना संकटात सापडलेला.
अशा स्थितीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ईशान किशन व उपकर्णधार हार्दिक पंड्या यांनी काहीसे आक्रमक रूप धारण करत भारताचा डाव सावरला. ईशानने सलग चौथ्या सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण केले. तर, हार्दिकने देखील आपले अर्धशतक झळकावले. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 138 धावांची भागीदारी केली. ईशानने 81 चेंडूवर 82 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने हार्दिकने 87 धावांची शानदार खेळी केली. अखेरीस जसप्रीत बुमराह याने महत्त्वपूर्ण 16 धावा करत भारताला 266 पर्यंतचा पल्ला गाठून दिला.
पाकिस्तान संघासाठी सर्व दहा बळी वेगवान गोलंदाजांनी टिपले. शाहिनने सर्वाधिक चार बळी घेत पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. हारिस रौफ व नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
(Asia Cup 2023 INDvPAK Hardik Pandya And Ishan Kishan Hits Fifty Shaheen Took Four Wickets)
महत्वाच्या बातम्या –
वनडे आशिया चषकात 2014 पासून विराटची बॅट शांतच, समोर आले चाहत्यांची चिंता वाढवणारे आकडे
भारताचा सलग तिसरा फलंदाज स्वस्तात बाद! हॅरिस रौफने केली श्रेयस अय्यरची शिकार