भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सोमवारी (4 सप्टेंबर) नेपाळविरुद्ध वनडे सामना खेळत आहे. आशिया चषक 2023 मधील भारताचा हा दुसरा सामना आहे. विराटने सामन्याच्या दुसऱ्याच षठकात एक महत्वपूर्ण झेल सोडला होता. मात्र, नेपाळच्या डावातील 30 व्या षटकात त्याने एक अप्रतिम झेल पकडला आणि आपल्या नावावर खास विक्रम देखील नोंदवला.
विराट कोहली (Virat Kohli) वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने न्यूझीलंडचा माजी दिग्गज रॉस टेलर (Ross Taylor) याचा विक्रम मोडत हा क्रमांक पटकावला आहे. रॉस टेलरच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 142 झेल आहेत. दुसरीकडे विराटच्या नावावर आता 143 झेल नोंदवले गेले आहेत. यादीत पहिल्या क्रमांकावर माहेला जयवर्धने, दुसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग आणि तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद अजहरुद्दीन यांची नावे आहेत. भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. (Big record of legendary Ross Taylor is broken by Virat! Got fourth rank in special list)
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू
218 – माहेला जयवर्धने
160 – रिकी पाँटिंग
156 – मोहम्मद अजहरुद्दीन
143 – विराट कोहली*
142 – रॉस टेलर
140 – सचिन तेंडुलकर
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
नेपाळ प्लेईंग इलेव्हन- असिफ शेख, कुशल भुर्टेल,रोहित पौडेल (कर्णधार), भीम, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण छेत्री, ललित राजबंशी.
महत्वाच्या बातम्या –
नेपाळच्या सलामीवीराने काढला भारतीय गोलंदाजांचा घाम! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू
पंतच्या फिटनेसबाबत चांगली अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाने शेअर केला नवा व्हिडिओ