आशिया चषक 2023 मध्ये 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर मुसळधार पावसामुळे खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने चेंडूसोबत केलेली कामगिरी नक्कीच अप्रतिम होती. आफ्रिदीने 10 षटकात 35 धावा देत 4 बळी घेतले. यामध्ये त्याच्या नावावर सर्वात महत्त्वाच्या दोन विकेट भारतीय संघातचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या होत्या.
या सामन्यापूर्वीच शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) भारतीय संघाच्या फलंदाजांसाठी मोठा धोका असल्याचे बोलले जात होते. आफ्रिदीने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) आपल्या 2 चांगल्या चेंडूंने गोलंदजी करून हा पराक्रम गाजवला. हा सामना रद्द झाल्यानंतर आफ्रिदीने स्टार स्पोर्ट्सवरील एका वक्तव्यात विराट कोहलीबद्दल वक्तव्य केले आहे.
आफ्रिदी म्हणाला की, “विराट हा दिग्गज खेळाडू आहे. तो भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा आहे. पाकिस्तानविरुद्ध भरपूर धावा करण्यासोबतच त्याने आपल्या संघाला सामना जिंकून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”
पााकिस्तानच्या घातक गोलंदाजीपुढे भारतीय संघातील वरच्या फळीतील फलंदाजांना काही करता आले नाही. पंरतु, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने पाकिस्तान गोलंदीजांनविरुद्ध अप्रितीम खेळी केली त्याने 81 चेंडूत 82 धावा केल्या. आणि भारतीय संघाच्या धावांचा गाडा पुढे ओडला.
10 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामना परत होण्याची शक्यता आहे.
आशिया चषक 2023 मध्ये, वनडे प्रकारामध्ये 4 वर्षांनंतर समोरासमोर आलेले भारत-पाकिस्तान आता 10 सप्टेंबर रोजी सुपर-4 मध्ये स्पर्धा करतील अशी अपेक्षा आहे. जिथे पाकिस्तान संघ 3 गुणांसह सुपर-4 साठी पात्र ठरला आहे. त्याचबरोबर भारतीय संघ नेपाळविरुद्ध विजयाची नोंद करून पुढील फेरीत आपले स्थान निश्चित करेल. अशी सगळ्यांना आशा आहे. (shaheen afridi said virat kohli is lenendary batsman)
महत्वाच्या बातम्या-
जायंट कॉर्नवॉलचे CPL मध्ये वादळ! ऐतिहासिक शतक ठोकत मुलाला दिले ‘बर्थ डे’ गिफ्ट
का होतोय शुबमन फ्लॉप? दिग्गजाने सांगितले खरे कारण, जाणून घ्या लगेच