---Advertisement---

का होतोय शुबमन फ्लॉप? दिग्गजाने सांगितले खरे कारण, जाणून घ्या लगेच

Shubman Gill
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेतील पहिला सामना भारतीय संघाने  पाकिस्तानविरुद्ध खेळला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान शुबमन गिल याला सलामवीराची संधी मिळाली, पण त्याचा त्याला अजिबात फायदा उचलता आला नाही. या सामन्यादरम्यान त्याने 32 चेंडूत केवळ 10 धावा केल्या आणि केवळ एक चौकार मारला. शुभमनने बचावावर अधिक लक्ष केंद्रित केले आणि शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे तो त्याच्या लयीत अजिबात दिसत नव्हता. यावर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने प्रतिक्रीया दिला आहे.

माध्यमातील वृतांसोबत बोलताना हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला की, “मला वाटतं शुबमन गिल (Shubman Gill) खूप क्रिकेट खेळतोय. तो खूप दिवसांपासून सतत खेळत आहे. त्याच्यासाठी आयपीएल खूप चांगली गेली होती. आयपीयल ही खूप मोठी स्पर्धा आहे. त्याचे सामने सतत असतात. यामध्ये तुम्हाला सतत प्रवास करावा लागतो. यामुळे आरामाची गरज असते.”

पुढे भारताचा माजी खेळाडू म्हणाला की, “शुबमनने काही काळासाठी सुट्टी घेतली पाहिजे. तो परत त्याच्या फॉर्ममध्ये येईल. त्याच्या खेळाच्या शैलीवर कोणतेही प्रश्नचिंन्ह नाही. पण त्याचा आत्मविश्वास कमी पडत आहे. त्याला आरामाची गरज आहे. शुबमनने स्वताला थोडा वेळ द्यायला पाहिजे. असे झाले तर तो स्वताला परत फॉर्ममध्ये आणू शकतो.”

याआधी माजी फलंदाज गौतम गंभीरने शुबमनला तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेधले होते. येणाऱ्या चेंडूंविरुद्ध त्याला आपले तंत्र सुधारावे लागेल, असे गंभीर म्हणाला होता.

आशिया चषकातील पाचवा सामना भारत विरुद्ध नेपाळ सोमवारी (4 सप्टेंबर) होणार आहे. यात शुबमन गिल कशाप्रकारे फलंदाजी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोबतच भारतीय संघाच्या वरच्य फळीतील फलंदाजांना पाकिस्तानविरुद्ध काही खास करता आले नाही. नेपाळविरुद्ध भारताचे फलंदाज कसे खेळतात हे ही पाहणे महत्वाचे ठरेल. (harbhajan singh said shubham gill is good but batsman he need rest)

महत्वाच्या बातम्या- 
“आम्ही रोहित-विराटला पाहून मोठे झालो”, भारताविरुद्धच्या सामन्याआधी नेपाळचा कर्णधार भावूक  
भारतीय फलंदाजाने गायले पाकिस्तानच्या गोलंदाजांचे गुनगाण, म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांना…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---