आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध रंगला होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आता भारत आणि पाकिस्तान संघ परत 10 ऑक्टोंबरला आमने सामने येणार आहेत. हा सामना कोंलोंबो या ठिकाणी होणार होता. परंतु, हा सामना पावसामुळे दुसऱ्या ठिकाणी आयोजीत केला जावू शकतो. यासोबतच सुपर 4 मधील सामने ही शिफ्ट केले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोलंबो आणि कॅंडीमध्ये मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅंडीच्या पल्लेकेले स्टेडियमवर खेळले गेलेले भारताचे दोन्ही सामने पावसामुळे अडचणीत आले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात एकच डाव खेळता आला, तर भारताच्या नेपाळविरुद्धच्या सामन्यालाही पावसाचा फटका बसला.
माध्यमातील वृत्तानुसार, ब्रॉडकास्ट ऑपरेटरना त्यांच्या सुविधा हंबनटोटा येथे हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. हंबनटोटामध्ये अलीकडच्या आठवड्यात दुष्काळ पडला होता. सुपर फोरचे पाच सामने कोलंबोमध्ये आणि अंतिम सामना हंबनटोटा येथे होणार आहे.
हंबनटोटाचे राजपक्षे स्टेडियम आशिया चषकाच्या उद्घाटन कार्यक्रमाचा भाग नव्हते. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचे यजमानपद भूषवले होते तेव्हा ऑगस्टमध्ये येथे शेवटचा वनडे सामना खेळला गेला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्याने या दोन्ही देशांमधील पुढील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचाही प्रस्ताव आहे मांजला आहे.
आशिया चषक 2023 चा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात झाला होता. त्यात पाकिस्तानने 238 धावांनी विजय मिळवला. यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. भारताने दुसऱ्या सामन्यात नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला होता. (asia cup 2023 match shift to hambantota)
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2023 । बांगलादेश संघात स्टार फलंदाजाचे कमबॅक, सुपर फोरमध्ये संघाला देणार ताकद
IND vs NEP : भारताने 10 विकेट्सने जिंकला सामना, पण सर्वत्र रंगलीये किशनच्या झेलाची चर्चा