आशिया चषक 2023चा वाद मागच्या बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहे. बीसीसीआय सचिन आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तान दौरा करणार नाही, अशी माहिती मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषकात भारताचे सामने पाकिस्तनबाहेर आयोजित करण्याचाही विचार केला. मात्र, दोन्ही देशांमधली तनाव आता अधिकच वाढताना दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार आशिया चषक 2023 रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान सरकारमधील राजकीय संघर्षामुळे भारतीय संघा मागच्या मोठ्या काळापासून पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाहीये. आगामी आशिया चषकात देखील याच कारणास्तव भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास जय शहा (Jai Shah) यांचा नकार आहे. जय शहांनी आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केल्यानंतर तेव्हाचे पीसीबी प्रमुख रमीज राजा (Ramiz Raja) यांनी आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयला धमकावले होते. भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये येणार नसेल, तर पाकिस्तान देखील वनडे विश्वचषकात भाग घेणार नाही, जो यावर्षी भारतात आयोजित केला जाणार आहे, असे विधान राजांनी केले होते. मात्र, राजांचे हे विधान त्यांनाच भारी पडले. पुढे काही दिवसांनी त्यांना पीसीबीचे अध्यक्षपद सोडावे लागले आणि नजम सेठी पीसीबीचे नवीन अध्यक्ष बनले. मात्र, नवीन अध्यक्षांच्या मार्गदर्शनात देखील पीसीबीला आशिया चषकावर अद्याप कुठलाच तोडला निघू शकला नाही.
पाकिस्तानच्या एका माध्यमाने अशी माहिती दिली आहे की, आशिया चषक पाकिस्तानमध्ये खेळवण्यासाठी पाकिस्तान अजूनही प्रयत्नशील आहे आणि बोर्ड माघार घेण्यासाठी तयार नाहीये. अशात ही स्पर्धा रद्द देखील होऊ शकते. एवढेच नाही, आशिया चषक रद्द झाल्यानंतर बीसीसीआय यादरम्यानच्या मोकळ्या काळात पाच देशांची मिळून एक स्पर्धा आयोजित करण्याच्या तयारीत आहे, अशीही माहिती समोर येत आहे. असे असले तरी, पाकिस्तान मात्र त्यांच्या हायब्रिड (भारताचे सामने पाकिस्तानबाहेर) आणि पाकिस्तानमध्ये आशिया चषक आयोजित करण्याच्या मुद्यावर कायम आहे.
दरम्यान, आशिया चषका संपल्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघाला आयसीसी वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवायचे आहे. बीसीसीआयमुळे आशिया चषक रद्द झाला किंवा पाकिस्तानबाहेर खेळवला गेला, तर पीसीबी आशिया चषकाविषयी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. (Asia Cup 2023 on the verge of cancellation due to BCCI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवांनी हलले राजस्थान-सीएसकेचे सिंहासन! मुंबईची मुसंडी मारण्यास सुरुवात, अशी आहे गुणतालिका
डेव्हिड-पोलार्डची तुलना होऊ लागल्यावर कॅप्टन रोहितचे मोठे वक्तव्य, म्हणाला “त्याच्याकडे क्षमता आहे. मात्र…”