भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन नुकताच आशिया चषकातून मागारी परतला. सॅमसनवर अनेकदा संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडून दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आशिया चषक 2023 साठी सॅमसनला राखीव खेळाडू म्हणून संघात घेतले होते. पण मालिका अर्ध्यात असतानाच त्याला मायदेशात पाढवले गेले. अशातच सॅमसने शेअर केलेल्या एका नवीन व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.
संजू सॅमसन (Sanju Samson) याने भारतासाठी 2015 मध्ये पहिला सामना खेळला होता. पण मागच्या आठ वर्षांमध्ये त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. श्रीलंकेत शुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ सुपर फोर फेरीमध्ये पोहोचला आहे. सॅसमन देखील भारतीय संघासासोबत आशिया चषकासाठी श्रीलंकेला गेला होता. मात्र, केएल राहुल संघात परतल्यामुळे त्याला मायदेशात पाठवले गेले. निवडकर्त्यांनी आधीच याविषयी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.
अशातच सॅमसनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून दुबईमध्ये गोल्फ खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. अनेकांनी असेही म्हटले आहे की, सॅमसन बीसीसीआयकडून सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे क्रिकेटपासून लांब चालला आहे. आशिया चषकानंतर भारतीय संघाला मायदेशात आय़सीसी विश्वचषक खेळायचा आहे. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात देखील सॅमसनला संधी दिली गेली नाहीये.
Sanju Samson playing Golf at Dubai. pic.twitter.com/8fwGKqVHvZ
— Johns. (@CricCrazyJohns) September 10, 2023
सॅमसनच्या एकंदरीत क्रिकेट कारकीर्दीवर विचार केला, तर त्याने भारतासाठी आतापर्यंत 13 वनडे आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 55.71 च्या सरासरीने 390 धावा केल्या केल्या आहेत. पण तरीही आशिया चषक आणि वनडे विश्वचषकात यष्टीरक्षक फलंदाजाला संधी मिळाली नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सॅमसनने 375 धावा केल्या आहेत. (Asia Cup 2023 Sanju Samson playing Golf at Dubai)
महत्वाच्या बातम्या –
“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ
पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक संघांची विजयी सलामी




