भारत आणि नेपाळ संघ सोमवारी (4 सप्टेंबर) आमने सामने आहेत. उभय संघांतील ही लढत कँडीमध्ये झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण नेपाळच्या सलामीवीर जोडीने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. अखेर शार्दुल ठाकूर याने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. मोहम्मद शणी आणि मोहम्मद सिराज मात्र या फलंदाजापुठे पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसले.
नाणेफेक गमावल्यानंतर नेपाळ संघ प्रथम फलंदाजीला आला. नेपाळसाठी डावाची सुरुवात कुशल भुर्टेल (Kushal Bhurtel) आणि असिफ शेख (Asif Sheikh) यांनी केली. खुशल बुर्टेल असिफपेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी करत होता आणि खेळपट्टीवर लवकर पाय जमवले होते. भुर्टेलने 25 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या होत्या. पण शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) याच्या स्विंग चेंडूवर त्याने यष्टीरक्षक ईशान किशन () याच्या हातात झेल दिला आणि विकेट गमावली. डावातील 10व्या षटकात नेपाळ संघाला हा पहिला झटका बसला. त्यावेळी संघाची धावसंख्या 65 होती.
Shardul Thakur – the golden arm of team India.
Always picks up crucial wickets and breaks the partnership! pic.twitter.com/qHaX9JRthU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2023
त्यानंतर नेपाळ संघाची दुसरी विकेट रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 16व्या षटकात घेतली. संघाची धावसंख्या 77 असताना भीम शार्की (Bhim Sharki) याने विकेट गमावली. (Asia Cup 2023, Shardul Thakur took first wicket for India in the match against Nepal)
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
नेपाळ प्लेईंग इलेव्हन- असिफ शेख, कुशल भुर्टेल,रोहित पौडेल (कर्णधार), भीम, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण छेत्री, ललित राजबंशी.
महत्वाच्या बातम्या –
ASIA CUP 2023 । भारताचे गचाळ क्षेत्ररक्षण! पहिल्या पाच षटकात सोडले तीन महत्वाचे कॅच
शेवटी मान्य केलेच! शाहीन आफ्रिदीचे मोठे वक्तव्य, म्हणाला, ‘विराट दिग्गज…’