आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरवात झाली आहे. यात 4 सप्टेंबरला भारतीय संघाने नेपाळविरुद्ध खेळताना 10 विकेटने दणदणीत विजय मिळवला आणि स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये पदार्पण केले. आता या स्पर्धेचा सहावा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे.
पहिल्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला होता, तर अफगाणिस्तानला बांगलादेशने पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. सुपर 4 मध्ये श्रीलंकेचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे, तर अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये स्थान मिळवायचे असल्यास श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 10 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये श्रीलंका संघ 6-3 ने आघाडीवर आहे आणि एक सामना रद्द झाला आहे.
अफगाणिस्तान आणि श्रीलंका हा सामना 5 स्पटेंबराला लाहोरमध्ये गदाफी स्टेडीयमवर होणार आहे. सामन्याची सुरवात 3 वाजता होईल तर नाणेफेक 2:30 वाजता होणार आहे. याचे टीव्ही प्रेक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर चॅनेलवर असणार आहे. तसेच मोबाईल ऍप डिज्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता.
खेळपट्टीचा आढावा.
गद्दाफी स्टेडियमवर दोन्ही संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. नंतर खेळणाऱ्या संघाला लक्ष्याचा पाठलाग करणे थोडे सोपे होऊ शकते आणि त्यामुळेच प्रथम खेळणाऱ्या संघाला 280 च्या वरच्या धावसंख्येवर लक्ष ठेवावे लागेल. येथील खेळपट्टीवरून गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नाही.
श्रीलंकेविरुद्ध अफगाणिस्तान संभाव्य प्लेइंग 11
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रेहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, करीम जनात, रशीद खान, मुजीब-उर-रहमान, फझलहक फारुकी
अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंका संभाव्य प्लेइंग 11
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ अस्लांका, धनंजय डी सिल्वा, महिष टीक्शन, मतिशा पाथिराना, कसून रजिथा, प्रमोद मधुशन (asia cup 2023 sri lanka vs afghanistan match update)
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक 2023 पूर्वी सर्वात मोठी गुड न्यूज! दिग्गज केन विलियम्सन फूल फिट
सुपर फोरमध्ये भारताची दिमाखात एन्ट्री! नेपाळला नमवल्यानंतर पाकिस्तानशी करणार दोन हात