---Advertisement---

Super- 4 फेरीचं वेळापत्रक आलं रे! ‘या’ मैदानावरच खेळले जाणार Asia Cup 2023मधील अखेरचे 6 सामने

IND-vs-PAK
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेतील साखळी सामने पार पडले असून स्पर्धा सुपर- 4 फेरीपर्यंत पोहोचली आहे. सहा संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील अव्वल 2 संघच या फेरीत प्रवेश करणार होते. अ गटातून आधीच पाकिस्तान आणि भारत संघांनी जागा बनवली आहे. तसेच, बांगलादेशही सुपर-4 फेरीत पोहोचला होता. अशात आता मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) श्रीलंकेने अफगाणिस्तानला 2 धावांनी पराभूत करताच श्रीलंका सुपर- 4 फेरीत पोहोचणारा चौथा संघ बनला. यासोबतच सुपर- 4 फेरीचे वेळापत्रकही समोर आले आहे.

आशिया चषक 2023 सुपर-4 (Asia Cup 2023 Super- 4) फेरीतील पाच सामने आणि अंतिम सामना असे एकूण 6 सामने, कोलंबो येथे खेळण्यावर साशंकता होती. मात्र, आता 5 सप्टेंबर रोजी याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सुपर- 4 फेरीतील सामने
आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर- 4 फेरीत एकूण 6 सामने खेळले जातील. यामधील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात बुधवारी (दि. 6 सप्टेंबर) लाहोर येथे खेळला जाईल. याव्यतिरिक्त सर्व पाच सामने कोलंबो येथेच होणार होते. पाऊस आणि हवामान पाहता सामन्यांची ठिकाणे बदलून हंबनटोटा (Hambantota) येथे सामने खेळले जातील, असे बोलले जात होते. मात्र, आता याविषयी अंतिम निर्णय समोर आला आहे. सध्या या सामन्यांच्या ठिकाणात कोणताही बदल होणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. यानुसार, आता अंतिम सामन्यासह स्पर्धेतील अखेरचे 6 सामने कोलंबो (Colombo) येथीलच्या आर प्रेमदासा स्टेडिअममध्येच खेळले जाणार आहेत.

कोलंबोमधील हवामान
आशियाई क्रिकेट परिषदेने मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) आशिया चषकाच्या सुपर- 4 फेरीतील सामने आणि अंतिम सामना कोलंबो येथेच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, आगामी दिवसात श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील हवामान चांगले होण्याचे संकेत मिळाले आहेत. कोलंबो येथे जोरदार पावसामुळे मागील काही दिवसांमध्ये अशाप्रकारचा अंदाज बांधला जात होता की, आशिया चषकातील सुपर- 4 फेरीतील सामने आणि अंतिम सामना हंबनटोटा येथे खेळले जाऊ शकतात. मात्र, पीटीआयला मिळालेल्या वृत्तानुसार, एसीसीने श्रीलंका क्रिकेट, पीसीबी आणि अधिकृत ब्रॉडकास्टर्ससोबत सल्लामसलत केल्यानंतर सामने कोलंबो येथेच खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर-4 आणि अंतिम सामन्याचे वेळापत्र
6 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, लाहोर
9 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, कोलंबो
10 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध भारत, कोलंबो
12 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो
14 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, कोलंबो
15 सप्टेंबर- भारत विरुद्ध बांगलादेश, कोलंबो
17 सप्टेंबर- अंतिम सामना, कोलंबो

हेही वाचाच-
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने संघ तर निवडला, पण ‘या’ दिग्गज क्रिकेटर्सच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम
BREAKING । वर्ल्डकप 2023साठी ‘कांगारूं’चा 15 सदस्यीय संघ घोषित; स्टार खेळाडू बाहेर, तर ‘या’ पठ्ठ्याची एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---