---Advertisement---

आतल्या गोटातील बातमी! Asia Cupमध्ये ‘या’ 17 धुरंधरांना मिळू शकते Team Indiaमध्ये संधी, एक नाव हैराण करणारे

On: रविवार, ऑगस्ट 20, 2023 8:56 AM
Team-India
---Advertisement---

क्रिकेटप्रेमींसाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे. कारण, या वर्षात अनेक महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आशिया चषक 2023 होय. आशिया चषकाला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी भारतीय संघाच्या निवडीबाबत दिल्ली येथे बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हेदेखील सामील होऊ शकतात. ही बैठक निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाईल. या बैठकीनंतर भारतीय संघाची घोषणा केली जाईल. आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषकासाठी 17 सदस्यीय संघाची अट ठेवली आहे. अशात आशिया चषकासाठी संधी मिळू शकतील असे 17 भारतीय खेळाडू कोण असतील, याबाबत जाणून घेऊयात…

‘या’ खेळाडूंसोबत खेळणे निश्चित
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांचे खेळणे निश्चित आहे. या खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. तसेच, जेव्हा भारतीय संघाची घोषणा केली जाईल, तेव्हा असे म्हटले जात आहे की, काही खेळाडू असे असतील, ज्यांना अचानक संधी मिळेल. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत खुलासा केला आहे. त्या खेळाडूंमध्ये सर्वात मोठे नाव आर अश्विन याचे आहे. अश्विन मागील बऱ्याच काळापासून भारताच्या वनडे संघातून बाहेर आहे. मात्र, युझवेंद्र चहल याच्या घसरणाऱ्या फॉर्ममुळे निवडकर्ते अश्विनच्या नावावर विचार करू शकतात.

खेळाडूंच्या दुखापती सर्वात मोठी चिंत
आशिया चषकापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंच्या दुखापती ही सर्वात मोठी चिंता बनली आहे. संघाचे अनेक खेळाडू सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे विश्रांतीवर आहेत. या खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या नावाचाही समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या एनसीएमध्ये आपल्या दुखापतीवर काम करत आहेत. अशात या दोघांच्या निवडीबाबत सध्या कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. असे म्हटले जात आहे की, हे खेळाडू आता फिट आहेत आणि ते मैदानावर पुनरागमनासाठी तयारही आहेत. कारण, अलीकडील दिवसात दोघेही सराव करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. चला तर, पाहूयात आशिया चषकासाठी निवडले जाऊ शकतात, असे 17 भारतीय खेळाडू कोण आहेत?

आशिया चषकासाठी संभावित भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक, फिटनेसचा प्रश्न), श्रेयस अय्यर (फिटनेसचा प्रश्न), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, ईशान किशन (पर्यायी यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, युझवेंद्र चहल किंवा आर अश्विन. (asia cup 2023 these 17 players can get a chance in team india know here)

महत्त्वाच्या बातम्या-
नाद केला पण पुरा केला! टी20 क्रिकेटमध्ये UAEने रचला इतिहास, बलाढ्य New Zealandच्या ठेचल्या नांग्या
कधी, कुठे आणि कसा पाहायचा IND vs IRE संघातील दुसरा टी20 सामना, पाऊस करणार का खेळ खल्लास? वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---