महिला आशिया चषक (Women’s Asia Cup) शेवटच्या टप्यात आला आहे. यंदाच्या आशिया महिला चषकामध्ये एकूण 8 संघ होते. त्यातील चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले. अ गटामधून भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. तर ब गटातून श्रीलंका आणि बांगलादेश सेमीफायनलसाठी पात्र ठरले. (26 जुलै) रोजी सेमीफायनलचे दोन्ही सामने खेळले जाणार आहेत. सेमीफायनलसाठी भारतापुढे बांगलादेशचं मोठं आव्हान असणार आहे.
महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या एकूण 8 आशिया चषकाच्या स्पर्धेत भारत 7 वेळा चॅम्पियन बनला आहे, पण 2018 मध्ये बांगलादेश संघानंच भारताचा विजय रथ रोखला होता. 2018च्या आशिया चषकाच्या स्पर्धेत बांगलादेश संघानं फायनल सामन्यात भारताला केवळ 112 धावांवर ऑल आऊट केलं होतं आणि दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करुन त्यांनी आशिया चषकाच्या ट्राॅफीवर नाव कोरलं होतं.
सेमीफायनल 1 मध्ये भारत आणि बांगलादेश यांचा सामना होणार आहे. तर सेमीफायनल 2 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान आमने-सामने असणार आहेत. या स्पर्धेत भारतानं 3 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी सर्व सामन्यांवर वर्चस्व गाजवले आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली. तर दुसऱ्या सामन्यात युएईला पराभूत केले आणि तिसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव करुन सेमीफायनलसाठी तिकीट पक्कं केलं आहे.
भारतीय महिला संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधना (उपकर्णधार), अरुंधती रेड्डी, शोभना आशा, रिचा घोष, उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकार, शेफाली वर्मा, श्रेयंका पाटील, संजीवन सजना. दयालन हेमलता
बांगलादेश महिला संघ- निगार सुलताना (कर्णधार), नाहिदा अख्तर, दिलारा अख्तर, इश्मा तंजीम, जहांआरा आलम, मारुफा अख्तर, मुर्शिदा अख्तर, राबेया खान, रितू मोनी, रुबिया हैदर, रुमाना अहमद, सबिकून नहर, शोरिफा खातून, शोरना अख्तर
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ दोघांपैकी एकच फलंदाज इलेव्हनमध्ये खेळू शकेल, कारण पंतची जागा निश्चित आहे; माजी फील्डिंग कोचचे मत
एसएनबीपी स्कूलचे हॉकी स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व, सर्वच्या सर्व जेतेपदांवर मोहोर
आयपीएल 2025 पूर्वी ‘या’ 4 संघांचे बदलणार कर्णधार?