एशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तानच्या संघात व्हावा अशी चाहत्यांची अपेक्षा होती. बांगलादेशच्या हातून पराभव झाल्याने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. काल 28 सप्टेंबरला बांगलादेशविरूद्ध भारताचा अंतिम सामना झाला.
यासामन्यात भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठी एक पाकिस्तानी चाहता देखील होता. बशीर चाचा (चाचा शिकागो) यांनी या सामन्यात भारतीय समर्थकाची भुमिका बजावली आहे.
एवढेच नाही तर बिर्यानी हॉटेलचे मालक असलेले चाचा बशीर यांनी भारतीय सुपर फॅन सुधीर कुमारला एशिया कप स्पर्धेतील सामने पाहता यावेत यासाठी आर्थिक मदत देखील केली आहे.
चाचा बशीर हे भारत विरूद्ध बांगलादेश यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय जर्सी घातली होती तर हातात तिरंगा झेंडा देखिल होता.
भारतीय संघाचा निवासस्थान असलेल्या हॉटेलमध्ये बशीर चाचाने धोनी आणि रोहित शर्मासोबतचे फोटो आधीच सोशियल मेडियावर टाकले आहेत.
भारताने बांगलादेशचा 3 विकेटने पराभव करत सातव्यांदा एशिया कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
महत्वाच्या बातम्या-
-टॉप ३: यष्टीरक्षक एमएस धोनीने केले हे खास विश्वविक्रम
–गुजरात फॉर्च्यूनजायन्ट्सला मिळाला युवा कर्णधार
–भारताविरुद्ध पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या लिटॉन दासचा मोठा पराक्रम