---Advertisement---

पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा मास्टर स्ट्रोक! टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, वाचा प्लेइंग11

SL-vs-AFG
---Advertisement---

शनिवार २७ ऑगस्ट पासून आशियाा चषकाची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिलला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन संघात होणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यावेळी प्रथम गोलंदाजी करणमाऱ्या संघाला दुसऱ्यांसा लक्ष्याचा पाठलाग करताना सोपी परिस्थिती निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या सामन्यात अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आपल्या संघात फिरकीपटूंना महत्वाचे स्थान दिले आहे. मात्र, पीच रिपोर्टचा अंदाज घेतल्यास वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहण्याची शक्यता क्रिकेट जाणकारांकडून वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत फलंदाजांची कसोटी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे श्रीलंका संघाकडून दोन खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये दिलशान मदुशंका आणि मथिशा पथिराना या दोन खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर प्रत्येकाच्या नजरा खिळल्या आहेत.

श्रीलंका (प्लेइंग 11): दनुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरित असालंका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षाना, दिलशान मदुशंका, मथिशा पथिराना.

अफगाणिस्तान (प्लेइंग11): हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, करीम जनात, नजीबुल्ला जादरान, मोहम्मद नबी (कर्णधार), राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी.

दरम्यान, ब गटातील तिन्ही संघांकडे पाहिल्यास तिन्ही संघ मजबूत असल्लयाचे दिसत आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल त्याला प्वालिफायरमध्ये स्थान मिळवणे सोपे होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हिटमॅनचा सिक्स का बाबरचा क्लास?’ दुबईतील खेळपट्टी कोणाला करणार मदत, वाचा सविस्तर

आशिया चषक जिंकल्यावर रोहित होणार ‘शर्टलेस’, पाहा चाहत्याला काय दिलंय वचन
‘भावा लवकर लग्न उरकून टाक!’, पाहा रोहितने काय दिला बाबर आझमला सल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---