---Advertisement---

‘भावा लवकर लग्न उरकून टाक!’, पाहा रोहितने काय दिला बाबर आझमला सल्ला

On: शनिवार, ऑगस्ट 27, 2022 5:59 PM
babar azam rohit sharma
---Advertisement---

भारतीय संघाला रविवारी (२८ ऑगस्ट) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी टी-२० सामना खेळायचा आहे. आशिया चषक २०२२ हंगामाची सुरुवात शनिवारी (२७ ऑगस्ट) श्रीलंका आणि अफिगाणिस्तान सामन्याने होईल. हंगामातील दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने येतील. तत्पूर्वी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्यात मजेशीर चर्चा झाल्याचे समोर येत आहे. 

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हा रविवारी खेळला जाणारा सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा आहे. दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या दृष्टीने सरावाला लागले आहेत. यादरम्यान खेळाडूंनी एकमेकांशी भेटही झाली. शुक्रवारी (२६ ऑगस्ट) भारतीय संघ सराव सत्रासाठी मैदानात जात असताना खेळाडूंना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याची भेट घेतली. आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला असला, तरी तो संघासोबत यूएईत आहे. भारतीय खेळाडूंनी त्याच्या फिटनेसची विचारपूस केली. यावेळी आफ्रिदीनेही पंतसोबत बोलताना काही मजेशीर वक्तव्य केल्याचे समोर आले होते.

शुक्रवारी जेव्हा भारतीय संघ सराव सत्रानंतर ड्रेसिंग रूमकडे जात होता, तेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बाबर आझम (Babar Azam) यांची भेट झाली. पाकिस्तान क्रिकेटच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. भारतीय कर्णधार रोहित यावेळी मजेशीर अंदाजात होता. रोहित बाबरला म्हणाला की, “भाई लग्न वगैरे करून घे.” यावर पाकिस्तानी कर्णधाराचे उत्तर आले, “नाही, आत्ताच नाही.” या दोघांमधील ही चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, आकड्यांचा विचार केला, तर भारतीय संघ नेहमीच पाकिस्तानवर वरचढ ठरला आहे. पण मागच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान संघात लक्षणीय सुधारणा झाली आहे. मागच्या वर्षी पाकिस्तानने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पराभव केला होता. आता भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

भारतातच नव्हे पाकिस्तानातही इंडियन्सचे नाव! राहुलसोबतच्या एका फोटोसाठी PAKची महिला पत्रकार उतावीळ
‘ज्याने अफवा पसरवली तो इथेच आहे’, चहल-धनश्रीच्या नात्याविषयी रोहितने केला खुलासा
‘हात हलका रखना, हमारे बॉलर नयें है’, पाकिस्तानी चाहत्याची ‘हिटमॅन’ला कळकळीची विनंती  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---