---Advertisement---

आवेशसाठी ‘डू ऑर डाय’ ठरणार आशिया कप; सार करियर लागलयं दावावर

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 8:54 PM
Avesh-Khan
---Advertisement---

जगभरातील क्रिकेटप्रेमी सध्या आशिया चषक स्पर्धेची वाट पाहत आहेत. आगामी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांसमोर असतील. मागच्या वर्षी टी२२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताला मात दिली होती. आता भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल. आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे सामील नाही. त्याच्याऐवजी युवा वेगवान गोलंदाज आवेश खान याला संधी दिली गेली आहे. त्याच्यासाठी हा आशिया चषक तीन कारणाने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतात.

आवेश मागील काही काळापासून अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२२ मधील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेला आवेश सध्या अत्यंत महागडा ठरतोय. त्याने वेस्ट इंडीज दौऱ्यावर १० पेक्षा जास्तच्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या होत्या.

आशिया चषक संघात आवेशकडे मोठी जबाबदारी असेल. कारण या संघात भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंग यांच्यासह तो केवळ तिसरा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्यामुळे त्याला संधी मिळाल्यास तो चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. पर्यायांची कमतरता पाहता त्याला मिळालेल्या संधीचे सोने करण्याची गरज आहे.

आशिया चषक आवेशच्या कारकिर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सिद्ध होऊ शकतो. आशिया चषकातील कामगिरी पाहूनच त्याचा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश होणार की नाही हे स्पष्ट होईल.

आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ–
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, अवेश खान, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई.

महत्त्वाच्या बातम्या-

वेगाचा बादशहा नॉर्किएला मिळाला नवा संघ; युवा प्रिटोरियसचेही उजळले नशीब

रिषभ-उर्वशी वाद| पंतची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत; आता म्हणतोय…

बाबर आझमचं टेन्शंनं वाढलंय! पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी ‘या’ देशाने जाहिर केलाय मजबूत संघ

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---