---Advertisement---

रिषभ-उर्वशी वाद| पंतची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत; आता म्हणतोय…

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 6:18 PM
rishabh pant and urvashi Rautela
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या चर्चेत असण्यामागचे कारण क्रिकेट नसून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही आहे. उर्वशी नुकत्याच एका मुलाखतीत थेट नाव न घेता पंतबद्दल बोलली होती. ज्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक वाद सुरू आहेत. त्या दोघांंमधील वादाची चाहते मात्र चांगलीच मजा घेत आहेत. आता या वादावर पंतने पडदा टाकणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

उर्वशीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, पंत तिला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता. मात्र, आपल्याला वेळ नसल्यामुळे त्याच्यासोबत भेट झाली नाही. याप्रकरणी पंतने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे उर्वशीला उत्तर दिले होते.

पंतने स्टोरीमध्ये लिहिले होते की, “किती मजेची गोष्ट आहे की, काही लोक लोकप्रियतेसाठी मुलाखतीत खोटे बोलतात, जेणेकरून हे हेडलाईमध्ये येतील. हे लोक प्रसिद्धीसाठी किती भुकेले आहेत. देव त्यांना सुखी ठेवो. माझा पिछा सोड ताई! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात.” पंतने ही स्टोरी सात मिनिटांनंतर डिलिट केली होती.

त्याच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना उर्वशीने त्याला छोटू भैया म्हटले. तिने ट्वीट करत लिहिले की, “छोटू भैयाने फक्त बॅट-बॉल खेळायला पाहिजे. मी कोणी मुन्नी नाही, जी तुझ्यासारख्यासाठी बदनाम होईल.”

या संपूर्ण प्रकाराची सोशल मीडियावर चांगली चर्चा चालली आहे. त्यानंतर पंतने आणखी एक स्टोरी पोस्ट केली असून, यामध्ये लिहिले आहे की,

‘ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते त्या गोष्टींच्या मागे लागू नये.’

यावरून असे समजले जात आहे की, पंतने या संपूर्ण प्रकरणात एक पाऊल मागे होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पंत सुट्ट्यांचा आनंद घेत असून, तो थेट आशिया चषकात खेळताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी क्रिकेट चाहत्यांची पर्वणी! भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटे होणार विक्रीसाठी उपलब्ध

ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?

द हंड्रेडमध्ये डेविड मलानचा राडा! २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने केल्या तब्बल ‘इतक्या’ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---