जगातील सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या आशिया चषक 2022 मधील भारत पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याला दुबईत सुरुवात झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सर्वच भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत पाकिस्तानला निर्धारित 20 षटकात सर्वबाद 147 वर रोखले.
https://twitter.com/BCCI/status/1563919070210179075?t=ctTCs4IVdS1fIz_p3sjSfQ&s=19
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमार याने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला 10 धावांवर बाद केले. फखर झमानही 10 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. मोहम्मद रिझवान (43) व इफ्तिकार (22) अतिशय संथ खेळ्या करत बाद झाले. त्यानंतर इतर फलंदाज धावांसाठी पूर्णतः झगडताना दिसले. तळाचा फलंदाज शहनवाज दहानीने काही मोठे फटके मारले. अखेरीस पाकिस्तान 19.5 षटकात 147 धावांवर सर्वबाद झाला. भारतासाठी भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक 4 बळी मिळवले. त्याला हार्दिक पंड्याने 3 तर अर्शदीप सिंगने दोन बळी घेत चांगली साथ दिली. आवेश खान याला एक बळी मिळाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला दुसरा झटका! बाबरनंतर आलेल्या फकरला आवेशने चालता-बोलता धाडलं परत
ना सचिन ना धोनी; मैदानावर उतरताच विराट बनला ‘नंबर वन’
भारताच्या स्विंग किंगकडून पाक संघाचा किंग गपगार; असा फसवला की डोकं हलवतंच तंबूत परतला





