एशिया कप (Asia Cup)२०२२च्या हंगामाची सुरूवात येत्या २७ ऑगस्टपासून होणार आहे. यामधील सर्वात मोठा आणि महत्वाचा सामना २८ ऑगस्टला दुबई येथे खेळला जाणार आहे. हा सामना आहे भारत विरुद्ध पाकिस्तान. सर्वत्र एशिया कपची चर्चा सुरू असताना बहुतेक जणांना आठवत नसेल पहिली स्पर्धा कुठे आणि कधी सुरू झाली, त्याविषयी माहिती घेऊ.
जागतिक स्तरावर शारजाह क्रिकेट स्टेडियमची एक वेगळीच ओळख आहे. कारण एकाच मैदानावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय वनडे (२४५) सामन्यांचे आयोजन केले आहे. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली आहे. तर शारजाह क्रिकेट स्टेडियमने १९८४मध्ये सर्वप्रथम एशिया कपचे आयोजन केले होते. पहिल्या एशिया कपनंतर तब्बल ११ वर्षानंतर दुसऱ्यांदा शारजाहला एशिया कपचे आयोजन करण्याची संधी मिळाली. त्या हंगामामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघाचा समावेश होता. ज्यामध्ये भारताने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा एशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला.
अफगानिस्तानला आयसीसीचा सदस्य बनवण्यात शारजाहचा मोठा हात
बुखातिर ग्रुप आणि शारजाह यांनी एशिया कपचे आयोजन म्हणून त्यांची फक्त जबाबदारी पाडली नाही, तर एशिया क्रिकेटसाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहेत. त्यांनी २०१०मध्ये अफगानिस्तान क्रिकेट बोर्डला स्टेडियमची विचारणा केली. तेव्हा अफगानिस्तानकडे आवश्यक ती सुविधा नव्हती. यामुळेच त्यांचा संघ जागतिक स्तरावर पोहोचला असून एशिया क्रिकेट परिषद (एसीसी) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या दोन्हीचे ते सदस्य झाले. अफगानिस्तानने शारजाहमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या द्विपक्षीय मालिकांचे यजमानपद भुषविले. आता ते ३० ऑगस्टला शारजाहमध्ये बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे.
शारजाह क्रिकेट स्टेडियमचे कार्यकारी अध्यक्ष खलाफ बुखातिर यांनी म्हटले, “आम्ही पुन्हा एकदा एशिया कपचे आयोजन करण्यास उत्साहीत आहोत. आमचे स्टेडियम जागतिक विक्रम मोडण्यात, सामन्यांचा रोमांचक शेवट आणि सर्वाधिक प्रेक्षकसंख्या यासाठी प्रसिद्ध आहे. स्टेडियमच्या विस्ताराचे काम पूर्ण झाले असून आम्ही मोठ्या स्पर्धांसाठी तयार आहोत.”
या स्पर्धेत सहा संघाचा यामध्ये समावेश असून एकूण १३ सामने खेळले जाणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण
आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत एकुण १६० खेळाडू सहभागी
कुलदीपच्या विरोधात तब्बल १० वर्षांनंतर खेळतोय झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू, याआधी ‘या’ सामन्यात आले होते आमने-सामने