---Advertisement---

आशिया कपमध्ये तासभर उशिरा सुरू झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनीच्या पडद्यामागे नेमकं काय? स्टार फलंदाजाचा मोठा खुलासा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025 9:54 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज तिलक वर्माने (Tilak Verma) पाकिस्तानविरुद्ध झालेल्या आशिया कप 2025च्या (Asia Cup) अंतिम सामन्यानंतर झालेल्या तासभर उशिरा सुरू झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनी”बाबत नवा खुलासा केला आहे.

तिलकने त्या अंतिम सामन्यात 53 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव करून विजेतेपद पटकावलं. पण सामन्यानंतर एक अनपेक्षित प्रसंग घडला. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

मोहसिन नक्वी आणि भारतीय संघ व्यवस्थापन यांच्यात चर्चा सुरू असल्यामुळे प्रेझेंटेशन सेरेमनी तब्बल एक तास उशिरा सुरू झाली. अखेर भारताने आपला निर्णय बदलला नाही आणि नक्वी ट्रॉफी घेऊन परत गेले.

तिलक वर्माने सांगितले की, सर्व खेळाडू मैदानातच होते. आम्ही ठरवलं की ट्रॉफी नाही मिळाली तरी विजयाचा आनंद साजरा करू. त्याने ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या शोमध्ये सांगितलं की, आम्ही जवळपास तासभर मैदानावर वाट पाहत होतो. जर तुम्ही टीव्हीवरचे दृश्य पाहाल, तर दिसेल की मी जमिनीवर पडलेलो होतो, बाकी सगळेही तसेच होते. अर्शदीप सिंग (Arshdeep singh) तर रील बनवण्यात गुंतलेला होता. आम्ही सगळे ट्रॉफीची वाट पाहत होतो, पण ती आलीच नाही.

तिलक पुढे म्हणाला, अर्शदीपने म्हटलं, ‘चल, ट्रॉफी नाही तरी माहौल तयार करूया.’ त्याने सुचवलं की 2024 च्या टी20 वर्ल्डकपप्रमाणेच या वेळेसही ट्रॉफीशिवाय जल्लोष करू. मी, अभिषेक शर्मा आणि आणखी 5-6 जणांनी त्याला होकार दिला. आणि आम्ही त्याप्रमाणे साजरा केला.

आपल्या खेळीबद्दल बोलताना तिलक म्हणाला, आम्ही आत्मविश्वासात होतो, पण क्रिकेट हा गंमतीदार खेळ आहे. आशिया कप किंवा वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत जर एखाद्या दिवशी आपण आपल्या क्षमतेनुसार खेळलो नाही, तर सगळं संपतं.
पण पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये मी जसा खेळलो, तसं प्रत्येक सामन्यात खेळणं शक्य नसतं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---