शाहिद आफ्रिदी याच्या नेतृत्वात आशिया लायन्स संघ लिजेंड्स लीग क्रिकेट 2023चा विजेता ठरला. सोमवारी (20 मार्च) आशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात या लीगचा अंतिम सामना खेळला गेला. आशिया लायन्सने या सामन्यात शेन वॉटसनच्या नेतृत्वातील वर्ल्ड जायंट्स संघाला 7 विकेट्सने पराभूत केले.
उभय संघांतील या सामन्यात वर्ल्ड जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आशिला लायन्सने प्रथम गोलंदाजी करताना वर्ल्ड जायंट्स संघाला 4 बाद 147 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात आशिया लायन्सने हे लक्ष्य 16.1 षटकात 3 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. तिलकरत्ने दिलशान (Tillakaratne Dilshan) आणि उपूल थारंगा (Upul Tharanga) यांचे या विजयातील योगदान सर्वात महत्वाचे म्हणता येईल. दोघा सलामीवर जोडीने पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. अखेर दिग्गज ब्रेट ली याने 10व्या षटकात ही भागीदारी थरंगाला क्लीन बोल्ड करून मोडली. त्यानंतर दिलशान देखील 14व्या षटकात समिर पटेल याच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. दिलशानने 58, तर थरंगाने 57 धावांचे योगदान दिले.
It's Official – The Lions rule the Season 2 of LLCMasters! 🏏🦁💥@AsiaLionsLLC#LegendsLeagueCricket #LLCT20 #SkyexchnetLLCMaster #YahanSabBossHain pic.twitter.com/7oETzHflGf
— Legends League Cricket (@llct20) March 20, 2023
तत्पूर्वी वर्ल्ड जायंट्स संघासाठी वरच्या फळीतील फलंदाजांनी या अंतिम सामन्यात निराशा केल्याचेच पाहायला मिळाले. लेंडन सिमन्स, मॉर्न विक, आणि शेन वॉटसन यांनी अनुक्रमे 17, 0 आणि 0 अशा धावांवर विकेट्स गमावल्या. संघाची धावसंख्या 19 असताना वर्ल्ड जायंट्सने तीन विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर दिग्गज जॅक कॅलिस आणि रॉस टेलर यांनी डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. 17 व्या षटकात टेलरने 32 धावा करून विकेट गमावली, तर कॅलिसने बादा 78 धावा कुटल्या. पण अखेर कॅळिसची ही एकाकी झुंज अपयशी ठरला. वर्ल्ड जायंट्सला हा सामना 7 विकेट्सने गमावला.
(Asia Lions beat World Giants to win LLC title)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सुपरवुमन’ जेमिमा! मुंबईविरूद्ध टिपला WPL मधील सर्वोत्कृष्ट झेल, तुम्हीही पाहा व्हिडिओ
VIDEO: शाहिद आफ्रिदीने भारताचा तिरंगा समोर येताच केले असे कृत्य, भारतीय चाहते म्हणाले…