जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये १६वर्षाच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदक जिंकून हे स्पष्ट केले की भारताचे नेमबाजीचे भविष्य उत्तम हातात आहे.
सौरभने पुरूषांच्या १० मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्ण कामगिरी करत २०१०च्या विश्वचॅम्पियन टोमोयुकी मटसुदाला पराभूत केले. शेवटचा, २४वा शॉट झाल्यावर सौरभचे २४०.७ गुण होते. मात्र ४२ वर्षीय मटसुदाने २३वा शॉट थोडक्याच चुकवला. त्याने २३९.७ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले.
मेरठमधील कलिंगा गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या सौरभची ही पहिलीच वरिष्ठ गटातील स्पर्धा आहे. तसेच त्याने दोनच महिन्यापूर्वी कुमार गटातील विश्वचषकात सुवर्णपदक जिंकले आहे.
अकरावीचा विद्यार्थी असलेला सौरभ एशियन गेम्स झाल्यावर विश्व चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होण्यास दक्षिण कोरियाला जाणार आहे. ही स्पर्धा २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
सौरभने अमित शेरॉन या अकादमीमधून नेमबाजीचे धडे गिरवले आहेत. ही अकादमी मेरठपासून ५३ किमी अंतरावर बेनोली येथे आहे. जेव्हा तो घरी असतो तेव्हा तो वडिलांना शेतीत मदत करतो.
” मला शेती करायला आवडते. मला सरावातून जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी मी गावी जातो आणि वडिलांना शेतीत मदत करतो”, असे सौरभ म्हणाला.
सौरभ, नेमबाजीत एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणार पाचवा भारतीय खेळाडू आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी जसपाल राणा, रणधीर सिंग, जितू राय आणि रोंजन सोधी यांनी केली आहे.
तसेच सौरभने यावेळी एक विक्रमही केला. त्याने शेवटचे दोन शॉट्स १०.२ आणि १०.४ एवढ्या रेंजमध्ये मारले यामुळेच त्याला आघाडी मिळाली. तर जपानच्या मटसुदाचे शेवटचे दोन शॉट्स ८.९ आणि १०.३ असे होते.
तीन वर्षांपूर्वीच नेमबाजीला सुरूवात केल्यावर सौरभने या स्पर्धेतील पात्रता फेरीत विश्वचॅम्पियन आणि ऑलिंपिकचे विजेते मटसुदा आणि दक्षिण कोरियाचा जिन जिंगोहशी उत्तम स्पर्धा केली. त्याने ५८६ पॉइंट्स मिळवत पहिले स्थान पटकावले. तर जिंगोह दुसरा आणि वर्मा सहाव्या स्थानावर होता.
यामध्येच २९ वर्षीय अभिषेक वर्माही पहिलीच एशियन गेम खेळत होता. त्याने २१९.३ गुण मिळवून कांस्यपदक पटकावले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जसप्रीत बुमराह आणि क्रिकेट विक्रम… एक अनोखी प्रेमकहाणी!
–सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?
–एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक