इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताचे स्टार स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल आणि जोस्ना चिनप्पाने भारताला स्क्वॅशध्ये दोन पदके मिळवून दिली आहेत.
दोघींनाही महिला एकेरी प्रकारात प्रत्येकी कांस्यपदक मिळाले आहेत. पल्लीकलला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या चार वेळच्या विजेत्या निकोल अॅन डेव्हिडने पराभूत केले आहे.
निकोलने पल्लीकलला 3-0 (7-11,9-11,6-11) अशा फरकाने सरळ तीन सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे.
तर चिनप्पालाही उपांत्य फेरीत मलेशियाच्याच 19 वर्षीय सिवासांगारी सुब्रमण्यमने 3-1 असे पराभूत केले असून पहिल्यांदाच एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
पल्लीकल आणि चिनप्पा या दोघींनाही उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
पल्लीकलने याआधी एशियन गेम्समध्ये 2010 ला संघाकडून खेळताना कांस्यपदक तर 2014 मध्ये एकेरीत कांस्य तर संघाकडून खेळताना रौप्य पदक मिळवले आहे.
त्याचबरोबर यावर्षी गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरीत खेळताना दोन रौप्यपदके मिळाली आहेत. तर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला दुहेरीत सुवर्णपदक मिळाले होते.
तसेच चिनप्पाने एशियन गेम्समध्ये संघाकडून खेळताना 2010 ला कांस्य तर 2014 ला रौप्यपदक मिळाले होते.
याबरोबरच तिला 2018 च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत महिला दुहेरीत रौप्यपदक मिळाले आहे. तर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला दुहेरीत पल्लीकल बरोबर सुवर्णपदक मिळाले आहे.
स्क्वॅशमध्ये भारताला पुरुष एकेरीतील पदकही पक्के झाले आहे. सौरव घोषालनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला असून त्याचा सामना हाँगकाँगच्या औ चीन मिन्गविरुद्ध होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त ‘०’ धावा
– ८२ वर्षांत जे कुणालाही जमले नाही ते विराट ब्रिगेडला करण्याची संधी
– भारताचा फुटबॉलपटू केरळ महापूरग्रस्तांसाठी झाला स्वयंसेवक