---Advertisement---

भारताचा फुटबॉलपटू केरळ महापूरग्रस्तांसाठी झाला स्वयंसेवक

On: शुक्रवार, ऑगस्ट 24, 2018 8:27 PM
---Advertisement---

केरळ राज्य सध्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. या महापूरात जवळजवळ 400 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आसून भारतीय लष्कर महापूरग्रस्तांना यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.

त्यामुळे तेथील महापूरगस्तांसाठी देशातील अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. यात भारतीय फुटबॉल संघाचा आणि केरला ब्लास्टर संघातील खेळाडू सीके विनितही मदतीसाठी पुढे आला आहे.

केरळचाच असणाऱ्या विनितने रिलिफ कॅम्पमध्ये वॉलिंटीयर म्हणून काम करताना दिसून आला आहे. तो कोची येथील प्रादेशिक क्रीडा केंद्र येथे मदत सामग्री आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करताना कुली प्रमाणे ते काम करत होता.

त्याला बाजूला बसण्याची विनंतीही त्याने अमान्य करत महापूरग्रस्तांसाठी काम करणे पसंत केले. त्याचे ही मदत करत असतानाचे फोटो सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहेत. तसेच त्याचे या कृतीमुळे विनितच्या या कृतीने एक आदर्श घालून दिला आहे, असे त्याचे कौतुकही होत आहे.

केरला ब्लास्टरचा संघ या महिन्यात सराव शिबिर घेणार होता परंतू महापूरामुळे तो रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ते त्यांच्या शिबिरात बदल करतील.

केरळमधील महापूर ग्रस्तांसाठी अन्य खेळाडूही पुढे आले आहेत. यात संजू सॅमसन, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

तर भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध मिळवलेल्या तिसऱ्या सामन्यातील विजयानंतरची संपूर्ण मॅच फी महापूरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश

एशियन गेम्स: 28 वर्षांनंतर इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक

एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment