fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक

इंडोनेशिया येथील पालेमबर्ग आणि जकार्ता येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये  सहाव्या दिवशी रोइंगच्या भारतीय संघाने 1 सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर रोइंगमध्येच भारताला 2 कांस्यपदकेही मिळाली आहेत.

सवर्ण सिंग, दत्तू भोकनाळ, ओम प्रकाश आणि सुखमीत सिंग यांचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाने पुरुषांच्या क्वाट्रुपल स्कल प्रकारात 6 मिनिटे आणि 17.13 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले.

तसेच यजमान इंडोनेशिया आणि थायलंडला या प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळाले आहे.

हे सुवर्णपदक मिळवण्याआधी भारताला 2 कांस्यपदक मिळाले आहे. यात रोहित कुमार आणि भगवंत सिंग यांना लाइटवेट डबल्स स्कल्स प्रकारात आणि दुष्यंत चौधरीला लाइटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदक मिळाले आहे.

रोहित आणि भगवंत या भारतीय जोडीने जेएससी लेक येथे झालेल्या लाइटवेट डबल्स स्कल्स स्पर्धेत 7 मिनिटे आणि 4.61 सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.

याच स्पर्धेत जपानच्या मियायूरा मासायूकी आणि तकेडा मासाहिरोला सुवर्णपदक आणि कोरियाच्या किम ब्यूंगहून आणि ली मिनह्यूक यांनी रौप्यपदकाची कमाई केली.

जपानच्या जोडीने 7 मिनिटे आणि 1.70 सेकंदाची तर कोरियाच्या जोडीने 7 मिनिटे आणि 3.22 सेकंदाची वेळ नोंदवली आहे.

त्याचबरोबर भारताला रोइंगमध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या दुष्यंतने लाइटवेट सिंगल स्कल्स प्रकारात 7मिनिटे आणि 18.76 सेंकदाची वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत कोरियाच्या ह्यूंसूक पार्क आणि हाँगकाँगच्या चुन गुन चीउ यांना अनुक्रमे सुवर्णपदक आणि रौप्यपदक मिळाले.

दुष्यंतला 2013च्या नॅशनल चॅम्पियशिपमध्ये सर्वोत्तम रोअर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याने 2012 मध्ये आर्मी ट्रेनिंगकॅम्पमध्ये रोइंग करण्यास सुरुवात केली होती. तसेच त्याला 2014 च्या एशियन गेम्समध्येही याच प्रकारात कांस्यपदक मिळाले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

स्टीव स्मिथच्या त्या दोन जबरदस्त विकेट्स पाहिल्यात का?

पृथ्वी शाॅ ८ वर्षांचा असतानाच सचिनने केली होती मोठी भविष्यवाणी

फक्त १ गुण आणि विराट करणार शतकातील सर्वात मोठा पराक्रम…

You might also like