fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पृथ्वी शाॅ ८ वर्षांचा असतानाच सचिनने केली होती मोठी भविष्यवाणी

मुंबई | भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पृथ्वी शाॅबद्दल तो ८ वर्षांचाच असताना मोठी भविष्यवाणी केली होती. एक दिवस हा खेळाडू नक्की भारतीय संघात स्थान मिळवेल अशी भविष्यवाणी सचिनने केली होती.

इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड बुधवारी करण्यात आली आहे.

भारतीय संघात पहिल्यांदाच पृथ्वी शॉला आणि हनुमा विहारी या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर पहिल्या तीन सामन्यांसाठी संधी देण्यात आलेल्या मुरली विजय आणि कुलदीप यादवला वगळण्यात आले आहे.

याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिनने स्वत:च त्याच्या पर्सनल अॅपवर माहिती दिली आहे. “काही वर्षांपुर्वी माझ्या एका मित्राने मला पृथ्वी शाॅबदद्ल माहिती दिली आणि तसेच त्याच्या खेळाची माहिती घेऊन त्याला काही मदत करता येत असेल तर ती करायला सांगितले. यावर मी शाॅबरोबर काही सत्र काम केले आणि खेळ सुधारण्यासाठी त्याला काही टिप्स दिल्या. तसेच मित्राला तेव्हाच सांगितले की हा भारताकडून नक्की खेळेल. असे सचिन यावेळी म्हणाला.

पृथ्वी शाॅ हा जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा झालेला युवा क्रिकेटर आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

शॉने मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी केली आहे.

त्याचबरोबर नुकत्याच भारत अ संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यात शॉने दमदार कामगिरी केली होती. शॉ या दौऱ्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

शॉने या दौऱ्यात 8 सामन्यात 3 शतके आणि 2 अर्धशतकांसह 603 धावा केल्या आहेत. तर विहारीने 8 सामन्यात 410 धावा करताना 1 शतक आणि 2 अर्धशतके केली आहेत.

या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. शॉने 14 प्रथम श्रेणी सामन्यात 56.72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. यात त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती

विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश

You might also like