Loading...

एशियन गेम्स: भारताला सेलींग क्रिडा प्रकारात १ रौप्य आणि २ कांस्य पदके

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताला सेलींग या क्रिडा प्रकारात तीन पदके मिळाली आहेत.

यामध्ये 16 वर्षीय हर्षिता तोमरने महिलांच्या ओपन लेझर 4.7 प्रकारात कांस्य, वर्षा गौतम आणि श्वेता शेर्वेगार यांना 49 इआर एफ एक्स प्रकारात रौप्य पदक तर वरूण ठक्कर आणि चेंगप्पा केलापांडा यांना 49 इआर पुरूष प्रकारात कांस्य पदक मिळाले आहे.

हर्षिताने 15 शर्यतीमध्ये 62 पेनाल्टी गुण मिळवले तर याच प्रकारात पुरूषांमध्ये गोविंद बैरागी चौथा आला. यामध्ये त्याला 67 पेनाल्टी गुण मिळाले. वर्षा आणि श्वेताला 40 गुण तर अशोक आणि चेंगप्पा यांना 43 गुण मिळाले.

या 18व्या एशियन गेम्समध्ये भारताने आतापर्यंत 64 पदके जिंकली असून यामध्ये 13 सुवर्ण, 22 रौप्य आणि 29 कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच यातील 7 सुवर्णपदके अॅथलेटिक्समध्येच मिळाली आहेत.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

Loading...

असे आहेत युएफा चॅम्पियन्स लीगचे सर्व गट

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक

आशिया चषक स्पर्धेसाठी नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे?

पहिल्या १० मिनीटांतच विराटच्या नावावर ५ विक्रम

You might also like
Loading...