---Advertisement---

आशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही नेसनार साडी

On: शनिवार, मे 26, 2018 5:55 PM
---Advertisement---

2018 चे आशियाई गेम्स आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये इंडोनेशियामध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाच्यावेळी महिला खेळाडू गोल्डकोस्टला झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेप्रमाणेच पोशाख परिधान करतील.

म्हणजे महिला खेळाडू आशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाच्यावेळी पारंपारीक साडी न घालता निळी ट्राउझर आणि भारताचा लोगो असलेले ब्लेझर घालतील. टाईम्स आॅफ इंडियामध्ये दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा अभिप्राय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबद्दल भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले, “आशियाई गेम्सच्या दोन्ही कार्यक्रमासाठी आम्ही एकसमान ड्रेस कोड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला खेळाडू गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धेप्रमाणेच पोशाख परिधान करतील.”

याआधी आॅलिम्पिक,आशियाई गेम्स, राष्ट्रकूल स्पर्धा यांसारख्या स्पर्धेसाठी उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाच्यावेळी साडी आणि त्यावर निळे ब्लेझर घालत होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

गंभीर आरोप- आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक आॅस्ट्रेलियाच्याच खेळाडूंनाच आयपीएलमध्ये स्थान देतात

सुपर ओव्हर ‘मेडन’ टाकणाऱ्या जगातील एकमेव गोलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

१८ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम

राशिद खान अफगाणिस्तानचा हिरो आहे, आम्ही त्याला भारताला देणार नाही!

मोठा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

कोणते संघ किती वेळा गेले आहेत आयपीएल फायनलमध्ये?

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment