इंडोनेशियात सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या स्वप्ना बर्मनने महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे.
स्वप्ना गोळाफेक, उंच उडी आणि भालाफेक यामध्ये पहिल्या तर लांब उडीमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली. यावेळी तिने 6026 गुण मिळवत सुवर्णमय कामगिरी केली. 6000 गुणांच्या पुढे जाणारी ती फक्त पाचवी महिला अॅथलेटिक्स आहे. तर भारताची पुर्णिमा हेमब्राम चौथ्या स्थानावर राहिली.
भारताचे या प्रकारातील पहिले सुवर्णपदक आहे. अशाप्रकारे भारताचे या स्पर्धेतील अॅथलेटिक्समधील पाचवे सुवर्णपदक आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या क्रिडा प्रकारात 800 मीटर शर्यतसाठी स्वप्नाने 2 मिनिटे 21.13 सेंकद वेळ नोंदवत 803 गुण मिळवले.
#SwapnaBarman wins first ever GOLD MEDAL for #India in #Heptathlon at #AsianGames & she is only the Fifth Women to cross 6000 points! And she did all this fighting great pain for last three days! Salute!
Congrats #TeamIndiaAthletics for 5th Gold in #AsianGames2018 pic.twitter.com/ukMN08HDEK
— Athletics Federation of India (@afiindia) August 29, 2018
मंगळवारी (28ऑगस्ट) झालेल्या पहिल्या दिवसाच्या प्रकारातील 100 मीटरच्या शर्यतीत तिने 981 गुण मिळवत पाचव्या स्थानावर राहिली पण लांब उडीत कामगिरी उंचावली यामध्ये ती पहिल्या स्थानवार राहिली.
उंच उडीतही स्वप्ना पहिल्या स्थानावर राहिली. तिने पहिल्या दोन्ही प्रकारात पहिल्या स्थानावर तर हेमब्राम तिसऱ्या स्थानावर होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी( 29 ऑगस्ट) लांब उडीच्या पहिल्याच प्रयत्नात स्वप्नाने 5.82 मीटर आणि हेमब्राम 5.85 मीटर असे विक्रम नोंदवले.
स्वप्नाने पहिल्याच प्रयत्नात 50.63 मीटर भालाफेक केला होता. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर हेमब्रामचे कांस्य पदक हुकले कारण जपानच्या युकी यमासाकीने 46.48 मीटर भालाफेक केला आणि हेमब्रामने 45.48 मीटर भालाफेक केला होता.
18 व्या एशियन गेम्समधील पदतालिकेत भारत 54 पदकांसह आठव्या स्थानावर आहे. यामध्ये 11 सुवर्ण, 20 रौप्य आणि 23 कास्यं पदकांचा समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक
–सुवर्णपदक विजेत्या या भारतीय धावपटूने ५ महिन्याच्या आपल्या मुलाला अजूनही पाहिलेले नाही!
–एशियन गेम्स: केवळ ०.२४ सेंकदाने हुकले सुवर्णपदक
–एशियन गेम्स: टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक