fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एशियन गेम्स: तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या अरपिंदर सिंगला पुरूषांच्या ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक मिळाले. हे भारताचे या स्पर्धेतील 10वे सुवर्ण पदक आहे.

अरपिंदरने पाचव्या प्रयत्नात 16.77 मीटर एवढी उडी मारली. तर भारताचाच राकेश बाबू यामध्ये सहाव्या स्थानावर राहिला. त्याने सहाव्या प्रयत्नात 16.38 एवढी उडी मारली. 16.40 मीटर त्याची सर्वोत्तम उडी ठरली.

तब्बल 48 वर्षांनंतर भारताला या प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे. 1970ला मोहिंदर सिंग गीलने 16.11 मीटर उडी मारत सुवर्णपदक मिळवले होते.

एशियन गेम्समध्ये पहिले सुवर्ण पदक 1958ला मोहिंदर सिंग यांनी पटकावले आहे. तर लाभ सिंगने 1966ला कांस्य, 1970 मोहिंदर सिंग गीलने सुवर्ण आणि लाभ सिंगने रौप्य, 1974ला मोहिंदर सिंग गीलने रौप्य आणि 1982 एस बालसुब्रमन्यम कांस्य मिळवले आहेत. यामुळे भारताचे या प्रकारात आता तीन सुवर्णपदक झाले आहे.

तर या 18व्या एशियन गेम्समध्ये पुरूष स्क्वॅश संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. धावपटू मनजित सिंग आणि जीन्सन जॉन्सन हे दोघे 1500 मीटरसाठी पात्र ठरले आहे. मंगळवारी (28 आॅगस्ट) या पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत मनजितने सुवर्णपदक आणि जॉन्सनने रौप्यपदक जिंकले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: केवळ ०.२४ सेंकदाने हुकले सुवर्णपदक

एशियन गेम्स: टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक

एशियन गेम्स: ८०० मीटर शर्यतीत भारताची सुवर्ण आणि रौप्य कामगिरी

You might also like