भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने दुहेरीत योग्य असा साथीदार मिळत नसल्याने उद्यापासून सूरू होणाऱ्या एशियन गेम्समधून माघार घेतली आहे. ही १८वी एशियन गेम्स स्पर्धा इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरू होत आहे.
४५ वर्षीय पेसने आतापर्यंत दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे मिळुन १८ ग्रॅंडस्लॅम जिंकले आहेत. पेसने एशियन गेम्समध्ये एकूण ८ पदके मिळवली असून त्यात ५ सुवर्णपदकांचा समावेश आहे. तसेच मागील दोन एशियन गेम्समध्ये तो खेळला नाही.
रोहन बोपन्ना आणि दिविज शरण या दोघांनी एकत्र दुहेरीत खेळायचे ठरवल्यावर भारतीय टेनिस असोसिएशनने (एआयटीए) पेसला सुमित नागलशी जोडी करण्यास सांगितले. पण नागल हा टेनिसमध्ये हवा तसा तरबेज नाही. तो अजूनही शिकतच आहे.
“मला सांगण्यास खूप खेद वाटत आहे की मी उद्यापासून सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये नाही खेळणार”, असे पेसने म्हटले आहे.
“दुहेरीसाठी चांगला साथीदार मिळावा म्हणून मी मागील काही दिवसांपासून एआयटीएला सांगितले आहे. पण आम्हाला या स्पर्धेसाठी योग्य तो खेळाडू नाही मिळाला”, असे तो पुढे म्हणाला.
कर्णधार झिशान अलीकडे नागल किंवा रामकुमार रामनाथन या दोघांशिवाय कोणताच पर्याय नाही. मात्र रामनाथन हा कधीतरीच दुहेरीत खेळतो तर नागलची सध्याची कामगिरी अतिशय सुमार आहे. नागल सलग नऊ सामन्यात पराभूत झाला आहे.
एटीपी दुहेरी क्रमवारीत पहिल्या १००मध्ये भारताचे पाच टेनिसपटू आहेत.रोहन बोपन्ना ३२व्या, दिवीज शरण ३८व्या, लिएंडर पेस ७९व्या, जीवन नेडूंचेझियान ८८व्या आणि पुरव राजा ९०व्या स्थानावर आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट
–अटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते