इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये रविवारी भारतीय धावपटूंनी चांगली कामगिरी करताना भारताला पदके मिळवून दिली. परंतू भारताचा धावपटू गोविंदन लक्ष्मणनला मात्र त्याचे कांस्यपदक परत करावे लागले आहे.
त्याने पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीत हे कांस्यपदक मिळवले होते. परंतू ही शर्यत सुरु असताना त्याचा पाय ट्रॅकच्या बाहेर पडला. शर्यत संपण्याआधी ही गोष्ट लक्षात आली नव्हती त्यामुळे त्याला कांस्यपदक घोषित करण्यात आले होते.
या स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला होता. पण हा आनंद काही काळच मर्यादित राहिला. कारण शर्यत संपल्यानंतर त्याचा पाय ट्रॅकच्या बाहेर पडला असल्याचे लक्षात आल्याने त्याचे कांस्यपदक काढून घेण्यात आले.
असे असले तरी चाहत्यांची मने मात्र गोविंदनने जिंकली आहेत. 28 वर्षीय या धावपटूने या स्पर्धेत 29:44.91 अशी वेळ नोंदवली होती. मात्र त्याचे हे प्रयत्न आयएएएफच्या 163.3b नियमानुसार अयशस्वी ठरले.
Really feel for Govindan Lakshmanan who was earlier declared Bronze Medal winner in Men's 10000m,but has been disqualified because his foot once touched inside the track. All that effort for 4 yrs & such a difficult pill to swallow. Hope he is treated a winner when he comes back
— Virender Sehwag (@virendersehwag) August 26, 2018
Sir, humbly request you to see to it that #GovindanLakshmanan efforts do not go in vain. He is still a hero for us and should be treated that way.
— Shishir .P. Murthy 🇮🇳 (@demonhawk007) August 26, 2018
#GovindanLakshmanan You are a brave hero with or without a medal. You have won our hearts. Salute!
— Mangesh Patil (@drmangeshp25) August 26, 2018
https://twitter.com/SirJadejaaaa/status/1033767087989174272
Can't imagine what he must be going through after seeing 4 years of hardwork going in vein for one wrong footstep. But the way he raced, shows he is a true fighter and i am sure he will be back overcoming this heart break. Govindan Lakshmanan, chin up champion 💪
— Sayan (@Tweets_by_Sayan) August 26, 2018
भारतीय धावपटूंमध्ये हिमा दास, मोहम्मद अनास आणि द्यूती चंद यांनी रविवारी भारतासाठी प्रत्येकी रौप्यपदक जिंकले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारताच्या महिला, पुरुष संघाना तिरंदाजीत रौप्यपदक
–एशियन गेम्स: पीव्ही सिंधूचे ऐतिहासिक सुवर्ण हुकले, रौप्यपदकवार मानावे लागले समाधान
–एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक