चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत गुरुवारी (5 ऑक्टोबर) भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाले. महिला तिरंदाजी संघ आणि स्क्वॉश मिश्र दुहेरी अशी सुवर्णपदके सकाळच्या सत्रात आल्यानंतर, दुपारच्या सत्रात पुरुष तिरंदाजी संघाने सुवर्णपदक आपल्या नावे केले. यासह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 21 झाली.
GOLD MEDAL No. 21 for India 🔥🔥🔥
Archery: Trio of Abhishek, Ojas & Prathmesh beat powerhouse South Korean team 235-230 in Final of Men's Compound Team event.
Medal count: 84
📸 @worldarchery #AGwithIAS #IndiaAtAsianGames #AsianGames2022 pic.twitter.com/KWN3Iu8ekv
— India_AllSports (@India_AllSports) October 5, 2023
भारताच्या या पुरुष संघात ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश आहे. यापैकी ओजस व प्रथमेश हे महाराष्ट्रासाठी खेळत असतात. भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोरियाचा 230-225 असा पराभव केला. आता भारताचे एकूण पदकांची संख्या 84 झाली.
सकाळच्या सत्रात ज्योति सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या महिला तिरंदाजी संघाने भारताला 19वे सुवर्ण पदक जिंकून दिलेले. महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात तैवानला 230-228 अशा फरकाने पराभूत केले होते.
(Asian Games 2022 India Mens Won Gold In Compound Archery)
हेही वाचा-
भारताच्या रणरागिणींची कमाल! तिरंदाजीत मिळवलं Gold, देशाच्या नावावर Asian Gamesमध्ये 82वे पदक
विश्वचषकापूर्वी रोहितचे विधान चर्चेत; म्हणाला, ‘मला आणि खेळाडूंना माहितीये…’