---Advertisement---

Asian Games 2023 । पारुलने जिंकले दिवसातील पहिले सुवर्ण, अवघ्या ‘इतक्या’ मिनिटात 5000 मीटर धावली

Parul Chaudhary won the Gold in the Women's 5000m Final
---Advertisement---

आशियाई गेम्समध्ये मंगळवारी (3 ऑक्टोबर) भारताला पहिला सुवर्ण पदक पारुल चौधरी हिने मिळवून दिले. पारुलने 5000 मीटर रेसमध्ये पहिला क्रमांक मिळवून सुवर्ण पदक जिंकले. तिने हे अंतर कापण्यासाठी 15 मिनिट 14.75 सेकंद वेळ घेतला. दिवसातील भारताला मिळालेले हे पाचवे पदक ठरले.

आशियाई गेम्स 2023 चिनमध्ये खेळल्या जात अशून भारताची कामगिरी जबरदस्त राहिले आहे. मंगळवारी स्पर्धेच्या 10व्या दिवशी पारुल चौधरी (Parul Chaudhary) हिने भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले. यावर्षी आशियाई गेम्सचा 19वा हंगाम खेळला जात असून पारुलला मिळाले सुवर्णपदक चालू हंगामातील दुसरे पदक आहे. याआधी सोमवारी तिने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होते. चालू आशियाई गेम्समध्ये भारताच्या एकंदरीत प्रदर्शनाचा विचार केला, तर पारुलने 14वे सुवर्ण देशाला मिळवून दिले. स्पर्धेत भारताला आतापर्यंत भारताला एकूण 64 पदके मिळाली आहेत. यात 24 रौप्य आणि 26 कान्स पदकांचा समावेश आहे.

(Asian Games 2023 । Parul Chaudhary won the Gold in the Women’s 5000m Final)

महत्वाच्या बातम्या – 
Asian Games 2023 । भारताचे अजून एक पदक निश्चित, अभय आणि अनाहतची स्क्वॉश दुहेरीत चमकदार कामगिरी
BREAKING! इराणी कप 2023 रेस्ट ऑफ इंडियाच्या नावावर, सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी सौराष्ट्रने टेकले गुडघे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---