---Advertisement---

Asian Games 2023: भारताला मोठा धक्का, हिमा दास आशियाई खेळांना मुकणार

On: गुरूवार, जून 15, 2023 8:13 PM
Hima Das
---Advertisement---

आशियाई खेळ 2023 सप्टेंबरमध्ये खेळवले जाणार आहेत. तर आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 चे यजमानपद चीनकडे आहे. त्याचवेळी, याआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, भारताची स्टार धावपटू हिमा दास चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. हिमा दास एप्रिलमध्ये जखमी झाली होती, ज्यातून ती अध्याप बरी झालेली नाही. मात्र, भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी याला दुजोरा दिला. याआधी 2018 साली हिमा दासने जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटर वैयक्तिक रौप्यपदक जिंकले होते.

भारतीय अॅथलेटिक्स महासंघ काय म्हणाले?

मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर म्हणाले की, हिमा दासला (Hima Das) दुखापत झाली आहे. तिला हॅमस्ट्रिंगची दुखापत असून पाठीचाही त्रास आहे. तसेच, तिची वैद्यकीय तपासणी सुरू आहे, पण एएफआयच्या धोरणानुसार ती आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, असे दिसते. दरम्यान, याआधी ती गेल्या महिन्यात रांचीमध्ये आयोजित फेडरेशन कपही खेळली नव्हती. त्याच वेळी, भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या खेळाडूंना सूट देण्यात आली आहे. त्यांच्याव्यतिरिक्त, प्रत्येकाला सुरुवातीच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल, त्यानंतरच ते आशियाई क्रीडा स्पर्धेत निवडीसाठी दावा करू शकतील.

नीरज चोप्रासह या खेळाडूंना सूट मिळाली

उल्लेखनीय म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भालापटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा अविनाश साबळे (Avinash Sable) यांचा समावेश असलेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. प्रशिक्षक राधाकृष्णन नायर म्हणाले की, “स्नायूंच्या ताणामुळे दोन मोठ्या स्पर्धांमधून माघार घेणाऱ्या नीरज चोप्राने सराव सुरू केला आहे, मात्र सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. मात्र, या महिन्याच्या अखेरीस तो तंदुरुस्त होऊ शकतो.”

महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---