आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारतीय क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) उपांत्य सामन्यात बांगलादेश संघाविरुद्ध 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशला पराभूत करताच भारताने अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. या सामन्यात भारताकडून तिलक वर्मा याने झंझावाती अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, त्याने फक्त फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतूनही शानदार योगदान दिले. अशात तिलकने सामन्यानंतर लक्षवेधी भाष्य केले. त्याने आपली वादळी खेळी आई-वडिलांना समर्पित केली. यादरम्यानचा व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे.
काय म्हणाला तिलक?
तिलक वर्मा (Tilak Varma) याने सामन्यादरम्यान अर्धशतक केल्यानंतर सेलिब्रेशन करताना एक टॅटू दाखवला होता. त्याने सांगितला की, हा टॅटू कोणाचा आहे. त्याने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना म्हटले, “हे सेलिब्रेशन माझ्या आईसाठी होते. माझ्या छातीवर माझ्या पालकांचाच टॅटू होता. मागील काही सामने माझ्यासाठी संघर्षाचे होते. मात्र, मी आईला म्हणालो होतो की, मी पुढील सामन्यात चांगले प्रदर्शन करेल आणि त्यामुळेच मी हे तिला समर्पित केले.”
https://twitter.com/thecricketgully/status/1710152726544331226
‘मी माझ्या गोलंदाजीवर सातत्याने काम करतोय’
तिलक वर्मा याने त्याच्या आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजीविषयीही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी मागील सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मण, यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्याशी संवाद साधला होता की, आपण या खेळपट्टीवर गॅपमध्ये खेळू शकत नाही. त्यामुळे वादळी फलंदाजी करण्याची गरज आहे. माझा खेळ आक्रमक आहे आणि मी चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतो. मी माझ्या गोलंदाजीवरही काम करत आहे. मी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्याकडून टिप्स घेतल्या होत्या. तसेच, गोलंदाजीतूनही योगदान देण्याचा प्रयत्न आहे.”
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1710144074538533150
तिलकचा झंझावात
तिलकने बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, त्याने एकूण 26 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 55 धावा केल्या. याव्यतिरिक्त त्याने आधी 2 षटके गोलंदाजी करताना 5 धावा खर्चून 1 विकेटही घेतली होती. अशाप्रकारे त्याने अष्टपैलू योगदान देत संघाला विजय मिळवून दिला. भारताने बांगलादेशचे आव्हान 9.2 षटकात 1 विकेट गमावत पार केले. यावेळी कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यानेही 26 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 40 धावांचे योगदान दिले. (asian games 2023 cricketer tilak varma reacts on his bowling batting and tattoo vs bangladesh read)
हेही वाचा-
धक्कादायक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वीच भारताला तगडा झटका, स्टार खेळाडूला डेंग्यूची लागण
Asian Games: सेमीफायनलमध्ये ऋतुराजसेनेचा दणदणीत विजय, बांगलादेशला नमवत मिळवलं फायनलचं तिकीट