सध्या भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला टी20 सामना ग्वाल्हेरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर 7 गडी राखून शानदार विजय मिळवला. दोन्ही संघातील दुसरा टी20 सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन दाखवत 86 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या उत्कृष्ट कामगिरीवर आता भारताचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेटनी मोठे वक्तव्य केले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी रायन टेन डोशेट म्हणाले, “होय, आम्हाला खेळाडूंचा मजबूत गाभा तयार करायचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक 2025 आणि विश्वचषक (T20 WC 2026) येत असल्याने, भारतीय क्रिकेटमध्ये प्रत्येकजण कुठे उभा आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आमच्या संघात किती खोली आहे हे पाहणे चांगले आहे. संघात असे खेळाडू आहेत, जे अनेक उत्कृष्ट भूमिका निभावू शकतात जे समतोल राखण्यासाठी खूप महत्वाचे आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही एक खेळाडू (नितीश कुमार रेड्डी) पाहिला आहे जो 4-5 व्या क्रमांकावर धमाकेदार फलंदाजी करू शकतो तसेच फिनिशर देखील असू शकतो. त्यामुळे या द्विपक्षीय मालिकांमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे त्यांना तिथे जाऊन ते करण्याचे स्वातंत्र्य देण्याबद्दल आहे आणि ते करण्यासाठी ते नक्कीच चांगले आहेत, 120 चेंडूत प्रत्येक चेंडूवर धावा करणे आणि मारणे ही मानसिकता आहे.”
संजू सॅमसनबाबत (Sanju Samson) बोलताना सहाय्यक प्रशिक्षक म्हणाले, “पहिल्या 2 सामन्यांवर नजर टाकली, तर ग्वाल्हेरमध्ये पहिल्याच सामन्यात वेगवान सुरुवात करणाऱ्या संजूसाठी सहज मात करून अर्धशतक झळकावणे सोपे झाले असते. खेळाडूंनी त्यांचा खेळ वाढवावा अशी आमची इच्छा आहे, आम्हाला आता जसे आहे, तसे क्रिकेट पुढे न्यायचे आहे आणि आम्हाला पुढील 18 महिन्यात येणाऱ्या मोठ्या संकटाच्या क्षणांसाठी तयार राहायचे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करूनही संघांचा पराभव, भारताचा नंबर कितवा?
डीएसपी झालेल्या मोहम्मद सिराजची कुठे होणार पोस्टिंग?
IPL Auction 2025; मेगा लिलावात लखनऊचे ‘हे’ स्टार खेळाडू ठरणार अनसोल्ड?