आयपीएल २०२१ चा ३६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत राजस्थानसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला राजस्थान संघ फक्त १२१ धावा करू शकला. दिल्लीने दमदार गोलंदाजीच्या बळावर सामन्यात शानदार विजय मिळवला. दरम्यान त्यांचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने टी२० क्रिकेटमध्ये अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने पावरप्लेमध्ये आपले ३ गडी गमावले होते. त्यांची तिसरी विकेट दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने घेतली होती. अश्विनने डेविड मिलरला बाद केले होते. मिलर फक्त ७ धावा करून बाद झाला. अश्विनसाठी ही विकेट खूप खास होती, कारण ती त्याच्या टी-२० कारकिर्दीतील २५० वी विकेट होती.
या विकेटसह अश्विन टी-२० प्रकारामध्ये २५० विकेटचा टप्पा गाठणारा तिसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. सध्या अमित मिश्रा आणि पियुष चावला यांच्या संयुक्तपणे टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स आहेत. दोघांनी २००७ पासून टी-२० प्रकारात खेळायला सुरुवात केली आणि ते आजही हे प्रकारात खेळतात. दोघांच्या नावावर २६२ विकेट्स आहेत. अमितने २३६ सामन्यांमध्ये २६२ आणि चावला २४९ सामन्यांत २६२ विकेट घेतल्या आहेत.
The #VaathiRaid has been on in T20s since 2007 🔥#YehHaiNayiDilli #IPL2021 #DCvRR @ashwinravi99 pic.twitter.com/dVCDhQ4F7y
— Delhi Capitals (@DelhiCapitals) September 25, 2021
अश्विनने त्याच्या २५४ व्या टी -२० मध्ये आपली २५० वी विकेट घेतली. त्याखालोखाल हरभजन सिंग आहे, त्याने २३५ विकेट्स घेतल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे, त्याने २२९ विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वाधिक टी२० विकेट घेणारे पाच भारतीय गोलंदाज
अमित मिश्रा – २६२ विकेट्स
पियुष चावला – २६२ विकेट्स
आर. अश्विन – २५० विकेट्स
हरभजन सिंग – २३५ विकेट्स
युझवेंद्र चहल – २२९ विकेट्स
टी-२० प्रकारामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आहे. तो २००६ पासून टी-२९ खेळत आहे आणि त्याने आत्तापर्यंत ५४६ विकेट्स घेतल्या आहेत. तो अजूनही चांगल्या लयीत आहे.
सर्वाधिक टी२० विकेट घेणारे पाच गोलंदाज
ड्वेन ब्राव्हो – ५४६ विकेट्स
इम्रान ताहिर – ४२० बळी
सुनील नारायण – ४१३ विकेट्स
लसिथ मलिंगा – ३९० विकेट्स
राशिद खान – ३८५ विकेट्स
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्देवचं म्हणावे, नाही का? त्यागीच्या चेंडूवर धवनने स्वत:च घेतली स्वत:ची विकेट, बघा नेमकं काय झालं
रिषभने भारतीय खेळाडूवर दाखवला विश्वास, १२१ षटकार ठोकणाऱ्या परदेशी फलंदाजाला राजस्थानविरुद्ध नारळ
सॅमसन विकेटकिंपिग मोड ऑन! तडखाफडखी हात चालवत अय्यरला केले यष्टीचीत, फलंदाजही बुचकळ्यात