दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाने मोठी आघाडी घेतली असून माजी कर्णधार डीन एल्गर याने अप्रतिम फलंदाजीचा नमुना सादर केला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिका संघ 147 धावांनी आघाडीवर आहे. अद्याप दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली नाही.
पहिल्या डावात भारतीय संघ 245 धावांवर गुंडाळला गेला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला फलंदाजीसाठी संधी मिळाली. दुसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्सच्या नुकसानावर 256 धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवसाचा खेळ डीन एल्गर (140*) आणि मार्को यान्सेन (3*) यांनी सुरु केला. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात एकूण 34 षटकांचा खेळ खेळला गेला आणि दक्षिण आफ्रिका संघ 147 धावांनी आघाडीवर आहे. आफ्रिकेची धावसंख्या सध्या 7 विकेट्सच्या नुकसानावर 392 धावांपर्यंत पोहोचली आहे.
डीन एल्गर (Dean Elgar) याचे द्विशतक होणार असे वाटत असतानाच शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर त्याने यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात झेल दिला आणि विकेट गमावली. एल्गर 287 चेंडूत 185 धावांपर्यंत मजल मारू शकला. गेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee) यानेही 18 चेंडूत 19 धावांपर्यंत जमल मारली. भारतासाठी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (At lunch on Day 3 of the Boxing Day Test, the hosts stand in a commanding position with a lead of 147 runs.)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
AUS vs PAK: थेट कपाळावर दिला ॲाटोग्राफ! क्रिकेटर अन् चाहत्याचा भन्नाट फोटो Viral, पाहा कोण आहे तो
INDW vs AUSW: वानखेडेत टीम इंडियाने जिंकला टॉस, करणार पहिली…