दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला अपेक्षित सुरूवात करता आली नाही. पण मोक्याच्या वेळी केएल राहुल याने अर्धशतकी खेळी केल्यामुळे संघ सुस्थितीत पोहोचला. पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंक्या 8 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावांपर्यंत पोहोचली. पावसाच्या व्यत्ययामुळे दिवसभरात 59 षटकांचा खेळ होऊ शकला.
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला बॉक्सिंग डे कसोटी () सामन्यात प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. मंगळवारी (26 डिसेंबर) सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कमध्ये यजमान संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. कागिसो रबाडा याने विकेट्सचे पंचक घेत भारतीय संघाचे कंबरडे मोडले होते. पण केएल राहुल संयमी खेळी करत राहिला. राहुलने दिवसाखेर 105 चेंडूत 70* धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद शमी (0*) आणि राहुल बुधवारी (27 डिसेंबर) भारतासाठी दुसऱ्या दिवसाची सुरूवात करतील.
Early stumps called ☁
Kagiso Rabada shines on a rain-truncated opening day in Centurion 💥
📝 #SAvIND: https://t.co/REqMWoHhqd | #WTC25 pic.twitter.com/hxWfYDJF0o
— ICC (@ICC) December 26, 2023
भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा याच्या रुपात पहिली विकेट गमावली. 14 चेंडूत अवघ्या 5 धावा खर्च करून रोहित बाद झाला. दुसरी विकेट सलामीवीर यशस्वी जयस्वाल (17) याची होती. शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 2 धावा करून तंबूत परतला. चौथ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. पण त्यानेही 64 चेंडूत 38 धावा केल्यानंतर विकेट गमावली. श्रेयस अय्यर याने 50 चेंडूत 31 धावांची खेळी केल्यानंतर रबाडाच्या चेंडूवर विकेट गमावली. सातव्या क्रमांकावर आलेला रविचंद्रन अश्विन 8, आठव्या क्रमांकावर आलेला शार्दुल ठाकूर 24, तर नवव्या क्रमांकावर आलेला जसप्रीत बुमराह अवघी एक धाव करून बाद झाला.
दक्षिण आफ्रिका संघासाठी कागिसो रबाडा याने पहिल्या दिवशी 17 षटकात 44 धावा खर्च करून 5 विकेट्स नावावर केल्या. नांद्रे बर्गर यानेही 15 षटकात 53 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. मार्को जेनसन याने 15 षटकांमध्ये 52 धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. गेराल्ड कोएल्झी याला 12 षटकात 53 धावा खर्च करूनही अध्याप एकही विकेट मिळाली नाहीये. (At the end of the first day of the Boxing Day Test, India scored 208 for the loss of 8 wickets)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA । दक्षिण आफ्रिका अडचणीत, कर्णधाराच्या पुनरागमाबाबत संशय, पहिल्याच दिवशी झाली गंभीर दुखापत
VIDEO । थोडक्यात वाचला शार्दुल! मुंबईने पाच कोटी दिलेल्या गोलंदाजाने फोडलं असतं डोकं