भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील एकमात्र कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. शनिवारी (23 डिसेंबर) या सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ समाधानकारक स्थितीत पोहोचला, पण त्यांनी महत्वाच्या विकेट्स देखील गमावल्या आहेत. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सच्या नुकसानावर 233 धावा केल्या आणि भारतावर 46 धावांची आघाडी घेतली.
भारतीय संघाने या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर 187 धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 219 धावांवर सर्व विकेट्स गमावल्यानंतर भारताने मात्र 406 धावांपर्यंत मजल मारली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव आटोपला. शनिवारी (23 डिसेंबर) पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावल्या. पण आघाडीवर असणारा भारतीय संघ दिवसाखेर 46 धावांनी मागे पडला.
ताहलिया मॅकग्राथ हिने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी 177 धावात 73 धावांची अप्रतिम खेळी केली. तसेच एलिस पेरी हिने 91 चेंडूत 45 धावा केल्या. एनाबेल सदरलँड (32) आणि एशले गार्डनर (7) खेळपट्टीवर कामय आहेत. सलामीवीर बेथ मुनी (33) आणि फिबी लिचफिल्ड यांनी अपेक्षित खेळी नाही. त्यानंतर आलेल्या एलिस पेरीने आणि ताहलिया मॅकग्राथ यांनी मोठी भागीदारी केली. कर्णधार ऍलिस हिली हिनेही 32 धावांवर विकेट गमावली.
भारतासाठी या डावात स्नेह राणा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड आणि जेमिमाह रॉड्रिक्ज यांना अद्याप एकही विकेट मिळाली नाहीये. चौथ्या दिवसात पहिल्या काही षटकांचा खेळ महत्वाचा ठरणार ठरू शकतो. (At the end of the third day, Australia lead by 46 runs in the second innings)
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
भारत महिला: स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह, राजेश्वरी गायकवाड.
ऑस्ट्रेलिया महिला: बेथ मूनी, फिबी लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्राथ, एलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), एनाबेल सदरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, अलाना किंग, किम गार्थ, लॉरेन चीटल.
महत्वाच्या बातम्या –
दीप्ती-पूजाच्या नावावर मोठा विक्रम, फिनिशर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली खेळी नेहमी उल्लेखली जाणार
Video: पाकिस्तानी गोलंदाजाच्या घातक यॉर्करपुढे लागला नाही विस्फोटक मॅक्सवेलचा टिकाव, जोरात फिरवली बॅट अन्…