पुणे: चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या कॅमिल माझरेख याने दुसऱ्या मानांकित इटलीच्या लॉरेन्झो मुस्तेट्टीचा तीन सेटमध्ये सनसनाटी पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकीत पोलंडच्या कॅमिल माझरेखने इटलीच्या लॉरेन्झो मुसेट्टीचा टायब्रेकमध्ये 6-2 6-7(5), 6-4 असा पराभव केला. दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा असलेल्या या चौथ्या मालिकेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन तटेनिस संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
26वर्षीय माझरेखने सामन्यात सुरेख सुरुवात करत जागतिक क्रमवारीत 66व्या स्थानी असलेल्या मुसेट्टीचा पहिल्या सेटमध्ये सहज पराभव पराभव केला. पण त्यानंतर पिछाडीवर असलेल्या मुसेट्टीला दुसऱ्या सेटमध्ये सूर गवसला. टायब्रेकमध्ये इटलीचा स्टार खेळाडू मुसेट्टीने आक्रमक खेळ करत हा सेट जिंकून सामन्यात बरोबरी साधली.
यावेळी माझरेख म्हणाला की, ही लढत सोपी नव्हती. पहिल्या सेटनंतर लॉरेन्झो याने आपल्या खेळात बदल केला. त्याने मला प्रदिर्घ रॅलीज खेळायला लावल्या. त्याला खेळाची लय गवसली होती. त्यामुळे दुसऱ्या सेटमध्ये त्याचा सामना करणे खूपच कठिण होते. त्याच्या सर्व्हिसवर मी अचूक रिटर्न करू शकलो नाही हे देखिल खरे आहे, असे माजरझॅक याने सांगितले.
ज्या वेळेस १९ वर्षीय युवा मुस्सेटी लढतीत परत येणार असे वाटत होते, तेव्हाच जागतिक क्रमवारीत ९५व्या स्थानावर असणाऱ्या मोयोने कमालीचा जिगरबाज खेळ करून केवळ सेटच नाही, तर लढतही जिंकली.
माझरेख याची सर्व्हिस खूपच कठिण होती. त्याच्या सर्व्हिसमध्ये कमालीची अचूकता होती. तरी त्याला झुंजवल्याचे समाधान मला आहे. दुसऱ्या सेटला माझा खेळ चांगला झाला. मी सेटही जिंकला होता. तिसऱ्या सेटला आघाडी देखिल घेतली होती. तेव्हा मला जिंकण्याची संधी होती. पण, मला ती संधी साधता आली नाही याची खंत मला कायम राहिल. माझ्या चुका सुधारून पुढील आठवड्यात अधिक चांगला खेळ करेन असा मला विश्वास आहे, असे मुसेट्टीने लढतीनंतर बोलताना सांगितले.
उपांत्य फेरीत माझरेखचा सामना फिनलँडच्या एमिल रुसुवोरी याच्याशी शनिवारी होणार आहे. याआधी उपांत्यपूर्व फेरीत रुसूवोरीने गतविजेत्या जेरी व्हेसलीचा 6-3, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
22 वर्षीय रुसुवोरीने सलामीच्या लढतीत गतमालिकेतील उपविजेत्या एगोर गेरासिमोव्हचा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत रुसुवोरीने जेरी व्हेसलीचे आव्हान 1तास 17 मिनिटांत मोडीत काढले. हि प्रतिष्ठेची स्पर्धा आयएमजी यांच्या मालकी ची असून राईज वर्ल्डवाईड इन इंडिया यांनी संचालित केली आहे. एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दोन लढती शिल्लक असून त्यानंतर दुहेरीत उपांत्य फेरीत एन श्रीराम बालाजी व विष्णू वर्धन या भारतीय जोडीपुढे लूक सॅव्हील व जॉन पॅट्रेक स्मिथ या अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियन जोडीचे आव्हान असणार आहे. तर, रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीने याआधीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
एकेरी: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी):
कॅमिल माझरेख(पोलंड)वि.वि.लॉरेन्झो मुसेट्टी(इटली)[2] 6-2 6-7(5), 6-4;
एमिल रुसूवोरी(फिनलँड)[6]वि.वि.जेरी व्हेसली(चेक प्रजासत्ताक)[4] 6-3, 6-4;